indian railways

LIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही

 भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Feb 26, 2015, 07:32 AM IST

आता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू

ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.

Feb 3, 2015, 09:06 AM IST

रेल्वेच्या प्रत्येक गाडीत सीसीटीव्हीची नजर

 यापुढे रेल्वेच्या प्रत्येक गाडीत आणि तिच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. गाड्यांमध्ये होणारी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतलाय. 

Aug 27, 2014, 11:36 AM IST

रेल्वेच्या जेवणात झूरळ, IRCTCवर कारवाई

नवी दिल्ली- कोलकाता राजधानी एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झूरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत ही गंभीर बाब समोर आली असून या निष्काळजीपणासाठी रेल्वेने गाडीत कॅटरिंग सुविधा देणाऱ्या इंडियन कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) कारवाईचा बडगाही उगारला आहे. 

Aug 3, 2014, 06:16 PM IST

मुंबईकरांसाठी बुरे दिन, रेल्वे 'पास' वाढला दुपट्टीने

अच्छे दिन आने वाले है या आशेवर मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. पण, मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मुंबईकरांच्या पासच्या किंमतीत सुमारे दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Jun 20, 2014, 07:34 PM IST

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.

Jun 20, 2014, 05:48 PM IST

ट्रेनच्या एसी कोचमधून पडदे काढणार

रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.

Apr 1, 2014, 03:40 PM IST

रेल्वे प्रवासी भाड्यात ७ ऑक्टोबरपासून वाढ

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.

Oct 5, 2013, 08:23 AM IST

रेल्वेच्या भाड्यात आजपासून वाढ

रेल्वेच्या भाड्यात आज मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला खिसा खाली करावा लागणार आहे. स्लीपर क्लासच्या १००० किलोमीटरसाठी ६० रूपये तर एसी-३च्या तिकिटीसाठी १००० किलोमीटरला १०० रूपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील रेल्वेत तिकीट आणि पासच्या दरातही वाढ होत आहे.

Jan 21, 2013, 11:24 AM IST

रेल्वे तिकिट होणार मोबाईलवर बुक!

भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट तुम्ही मोबाईलवरूनही बुक करू शकतात.

Sep 14, 2012, 09:54 PM IST

रेल्वे बजेटची ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले

Mar 15, 2012, 03:30 PM IST

रेल्वे बजेट – काय आहे तुमच्या अपेक्षा!

केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी उद्या २०१२-१३ वर्षाचे रेल्वे बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय रेल्वे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोट्यवधी भारतीयांना भारतीय रेल्वे आपल्या इच्छित स्थळी पोहचवत सते. त्यामुळे आपल्या लाडक्या रेल्वेकडून भारतीयांना अनेक अपेक्षा आहेत.

Mar 13, 2012, 04:47 PM IST

रेल्वे अर्थसंकल्पात भाडे वाढ नाही?

संसदेत बुधवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि माल वाहतूकीच्या भाड्यात वाढ होणार नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी सेफ्टी सेस लागु करण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2012, 04:35 PM IST

झुकझुक गाडीचे आरक्षण ४ महिने आधी करता येणार

भारतीय रेल्वेचे नवे आगाऊ तिकिट आरक्षणाचे नियम शनिवारपासून लागू झाले. आता नव्या नियमानुसार तुम्हाला १२० दिवस अगोदन तिकिटं आरक्षित करता येणार आहेत.

Mar 11, 2012, 08:49 AM IST

गुवाहाटी रेल्वे अपघातात २ ठार

आसाममधील गुवाहटीजवळ रेल्वे अपघातात २ ठार, तर ५० जण जखमी झालेत. हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.

Feb 3, 2012, 12:50 PM IST