नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

देवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

Jul 11, 2023, 07:58 AM IST
'फडणवीस नागपूरला कलंक'  उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...

'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...

राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा

Jul 10, 2023, 21:10 PM IST
Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte Nitin Gadkari: सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी

Jul 05, 2023, 18:39 PM IST
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा असताना का नाकारला? Nitin Gadkari म्हणाले...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा असताना का नाकारला? Nitin Gadkari म्हणाले...

Nitin Gadkari :  नितीन गडकरी यांनी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांना याविषयी प्रश्न विचारता त्यांनी याविषयी त्याचं मत मांडलं आहे. 

Jul 05, 2023, 16:26 PM IST
...तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

...तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

Nitin Gadkari On Petrol Price: गडकरींनी 5600 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनांसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच कार्यक्रमांमधील भाषणामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी भविष्यवाणी करताना

Jul 05, 2023, 12:02 PM IST
"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा

Jul 01, 2023, 10:55 AM IST