नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत

Mar 21, 2023, 15:22 PM IST
Nitin Gadkari:  प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

Nitin Gadkari: प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही

Feb 19, 2023, 23:21 PM IST
"कितीही मस्ती असली तरी..."; नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले

"कितीही मस्ती असली तरी..."; नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले

Supriya Sule : मी जमिनीच्या अधिग्रहणाची परवानगी दिली नाही तर रस्त्याचे काम थांबून राहील, असा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.

Feb 18, 2023, 14:32 PM IST
Toll Exemption: नेत्यांकडून टोल का घेत नाही? Nitin Gadkari म्हणाले, "मी तो निर्णय घेतला तर..."

Toll Exemption: नेत्यांकडून टोल का घेत नाही? Nitin Gadkari म्हणाले, "मी तो निर्णय घेतला तर..."

Nitin Gadkari On Toll Tax Exemption to Netas: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेक विषयांवर आपली मतं उघडपणे मांडतात.

Feb 16, 2023, 15:41 PM IST
Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan

Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan

Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे.  2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे,

Feb 13, 2023, 11:14 AM IST
MLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!

MLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!

MLC election maharashtra 2023: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही. 

Feb 02, 2023, 20:39 PM IST
Vehicle Scrappage Policy : 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा

Vehicle Scrappage Policy : 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा

Vehicle Scrappage Policy :  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत देशात अनेक अशा नव्या योजना राबवल्या ज्या मार्गानं खऱ्या अर्थानं नवनवीन तंत्रज्ञान देशातीलन नागरिकांना अनुभवता आलं

Jan 31, 2023, 11:03 AM IST
Budget 2023: ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, बजेटच्या आधीच नितीन गडकरींची मोठी घोषणा!

Budget 2023: ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, बजेटच्या आधीच नितीन गडकरींची मोठी घोषणा!

Delhi mumbai expressway: यंदाच्या अर्थसंकल्पात जनतेला दिलासा देणार्‍या घोषणाही होऊ शकतात, अशी आशा जनतेला आहे. अर्थसंकल्पाला काही दिवस शिल्लक असताना आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Jan 25, 2023, 23:28 PM IST
Expressway: मोदी सरकारने करुन दाखवलं! Budget आधीच नितिन गडकरींनी केली मोठी घोषणा

Expressway: मोदी सरकारने करुन दाखवलं! Budget आधीच नितिन गडकरींनी केली मोठी घोषणा

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भातील मोठी घोषणा दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना केली. गडकरींनी सूचक विधान करत ही

Jan 25, 2023, 20:17 PM IST
Nitin Gadkari यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं थेट पोलिसांना आव्हान, पाहा कोण आहे जयेश कांथा

Nitin Gadkari यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं थेट पोलिसांना आव्हान, पाहा कोण आहे जयेश कांथा

बेळगावच्या तुरुंगात असलेला आरोपी आहे खूपच खतरनाक, बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल फोन आला कसा? पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Jan 18, 2023, 19:07 PM IST