नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Union Minister Gadkari received a threatening phone call from Belgaum Jail

Video | केंद्रीय मंत्री गडकरींना धमकी देणारा अखेर सापडला

Union Minister Gadkari received a threatening phone call from Belgaum Jail

Jan 15, 2023, 10:50 AM IST
कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला

कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला

Nitin Gadkari Death Threats : शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तीनवेळा धमकीचे फोन आले होते. यासह फोन करणाऱ्याने 100 कोटींची खंडणीही मागितली होती.

Jan 15, 2023, 10:02 AM IST
Nitin Gadkari Death Threat  : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari News:  भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Jan 15, 2023, 09:27 AM IST
Nitin Gadkari ना धमकी देणाऱ्याचा छडा लागला; 'या' ठिकाणाहून आला होता फोन

Nitin Gadkari ना धमकी देणाऱ्याचा छडा लागला; 'या' ठिकाणाहून आला होता फोन

आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकीचा फोन आला होता. अखेरीस हा फोन कुठून आलाय याची माहिती मिळाली आहे.

Jan 14, 2023, 22:47 PM IST
आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख

आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 3 वेळा आला धमकीचा फोन, नागपूरमधल्या जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी फोन

Jan 14, 2023, 13:33 PM IST
Ethanol Blended Petrol: बाईक, कारचालकांसाठी मोठी बातमी! नितीन गडकरींनी केली महत्त्वाची घोषणा

Ethanol Blended Petrol: बाईक, कारचालकांसाठी मोठी बातमी! नितीन गडकरींनी केली महत्त्वाची घोषणा

भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना श्रीलंका आणि बंगलादेशचा उल्लेख करत नितीन गडकरींनी भारतीय वाहनचालकांनाही एक गूड न्यूज दिली

Jan 12, 2023, 16:32 PM IST
We want to start Ram Rajya in the country said by Nitin Gadkari

Nitin Gadkari | देशात रामराज्य सुरु करायचे आहे : नितीन गडकरी

We want to start Ram Rajya in the country said by Nitin Gadkari

Jan 08, 2023, 16:20 PM IST
Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!

Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!

Mumbai News: नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली.

Jan 06, 2023, 23:11 PM IST
Nitin Gadkari : नितीन गडकरी झाले You Tuber! भाषणातून महिन्याला कमावतात 'इतके' रुपये

Nitin Gadkari : नितीन गडकरी झाले You Tuber! भाषणातून महिन्याला कमावतात 'इतके' रुपये

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केले आहे. यासोबत त्यांनी अमिताभ बच्चन यांना दिलेला गुरुमंत्रही त्यांनी यावेळी सांगितला

Dec 30, 2022, 13:05 PM IST
आता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy

आता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy

GPS Poll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या

Dec 16, 2022, 18:12 PM IST
Petrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर

Petrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर

Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता

Dec 13, 2022, 16:12 PM IST
PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.  

Dec 11, 2022, 15:05 PM IST