नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले.

Jan 28, 2024, 17:48 PM IST
Union Minister Nitin Gadkari on made a strong comment on casteism

'जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ...'; नितीन गडकरी असं का म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु आहे. तसेच राज्यात जातीपातीच्या राजकारणावरुन एकमेकांवर

Jan 28, 2024, 17:08 PM IST
2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

GPS Based Toll: हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST
80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.

Dec 18, 2023, 19:21 PM IST
Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Dec 11, 2023, 09:38 AM IST
'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Maharashtra Politics : राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात विरोधकांवर टीका केली आहे. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी आयोजित

Dec 02, 2023, 08:22 AM IST
नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता. 

Oct 30, 2023, 15:29 PM IST
एलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, 'चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात...'

एलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, 'चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात...'

Nitin Gadkari on Tesla Cars : आम्ही टेस्लाचे भारतात स्वागत करतो पण काही अटींचे त्यांना पालन करावे लागेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एलॉन मस्क यांच्यापुढे मांडली आहे.

Oct 26, 2023, 08:46 AM IST
‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण

Oct 21, 2023, 15:00 PM IST
'गडकरी'मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

'गडकरी'मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर

Oct 13, 2023, 14:04 PM IST
Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे. 

Oct 09, 2023, 12:42 PM IST
नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड

नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड

Nitin Gadkari Threatening Case : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता. त्यामुळे सध्या त्याला नागपुरातील कारागृहात आणण्यात आलं आहे.

Oct 07, 2023, 09:58 AM IST
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

Gadkari Movie : भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 06, 2023, 10:41 AM IST
राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023

Sep 29, 2023, 10:36 AM IST