रजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 5, 2018, 11:56 PM IST
रजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा title=

मुंबई  : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.

 रजनीकांत यांना याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांना राजकीय नेत्यांसह बॉलिवूडच्या दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. यात आता अभिनेता अक्षय कुमारची भर पडलेय.

रजनीकांत यांनी ३१ डिसेंबरला राजकीय प्रवेशाची घोषणा केली. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रितेश देशमुखसह, कबीर बेदी, खुशबू सुंदर यांनी शुभेच्छा दिल्यात.