Salman Khan Property : ना लग्न, ना मुलबाळ! मग सलमानची मालमत्ता कोणाला मिळणार? नाव आलं समोर

Salman Khan Property : बॉलिवूडमध्ये अभिनय करुन भाईजाने गडगंज संपत्ती कमावलंय. सलमान खानचं लग्न झालं त्यामुळे मुलबाळाचा प्रश्नच नाही. मग ही संपत्ती कोणाची होणार याचं उत्तर मिळालंय. 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2024, 08:16 AM IST
Salman Khan Property : ना लग्न, ना मुलबाळ! मग सलमानची मालमत्ता कोणाला मिळणार? नाव आलं समोर title=
Salman Khan Property No marriage no children So who will get Salman property The name came up

Salman Khan Property : गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडसह चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सलमान खान काही दिवसांपासून खूप चर्तेत आहे. त्याचा घरावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर बॉलिवूडसह राज्यात एकच खळबळ माजली उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत अनेकांना अटक केलीय. शिवाय भाईजानच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली. अशात सलमान खानच्या संपत्तीबद्दल मोठी अपडेट समोर येतं आहे. 

भाईजानची मालमत्ता कोणाला मिळणार?

सलमान खान आजही बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर आहे. अनेक प्रेमप्रकरणानंतरही दंबग खान आजही एकटा आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि कॅटरीना कैफ यांच्यासह अनेक अभिनेत्रीसोबत त्याच नाव जोडल्या गेलं. या तिघींसोबतच्या नात्याची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली होती. संगीता बिजलानीसोबत तर सलमान खानचा साखरपुडा झाला होता. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. (Salman Khan Property No marriage no children So who will get Salman property The name came up)

तब्बल तीन दशक बॉलिवूडमध्ये काम करुन भाईजान 4000 कोटींची संपत्ती कमावलीय. लग्न झालं नाही, मग मुलांचा प्रश्नच येत नाही, ना त्याने मुलं दत्तक घेतलंय. अशात एवढी गडगंज संपत्ती कोणाची होणार? या प्रश्नाच उत्तर मिळालंय. मिळालेल्या माहितीनुसार सलमानची संपत्ती ही चार लोकांमध्ये वाटली जाणार आहे. हे चार हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटली जाणार आहे. 

सलमान खानच्या कुटुंबात अनेक लोक आहेत. त्यातील त्याची संपत्ती ही भाऊ अरबाज, सोहेल, बहीण अलविरा आणि अर्पिता खान यांच्यामध्ये वाटणात येणार आहे. शिवाय त्याचा संपत्तीमधील काही पैसा तो त्याची एनजीओ बिईंग ह्युमनला देगणी म्हणून देईल असं म्हटलं जातंय. या एनजीओद्वारे भाईजान गरजू लोकांना शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि अनेक बाबतीत मदत करतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x