वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी खा 'ही' फळे, पोटावरची चरबी वितळू लागेल

Fruits For Weight Loss: अशा काही फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो जे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फळे खाण्याची सवय लावा. या फळांमुळे आरोग्यही चांगले राहते.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 26, 2023, 05:11 PM IST
वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी खा 'ही' फळे, पोटावरची चरबी वितळू लागेल title=

Weight Loss Diet: फळांना आहाराचा भाग बनवण्यास सांगितले जाते. फळे हे पोषक तत्वांचे चांगले स्रोत आहेत. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. अशा परिस्थितीत, जर काही फळे दररोज रिकाम्या पोटी खाल्ल्यास, ते वजन कमी करण्यात प्रभावी ठरतात आणि ते पोटाची चरबी जाळण्यास सुरवात करतात. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, घाणेरडे विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकले जातात आणि चयापचय सुधारते, ज्यामुळे वजन कमी होते. येथे जाणून घ्या हे कोणते पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.

पपई

व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी समृद्ध, पपई त्वचा, पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी खूप चांगली आहे. यामध्ये फायदेशीर एंजाइम आढळतात जे आरोग्य चांगले ठेवतात. रोज रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास वजन कमी होऊ शकते. पपई या फळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. हे फळ हायड्रेट राहण्यास मदत करते. 

पेर

फायबरने समृद्ध नाशपाती म्हणजे पेर आहाराचा एक भाग बनवता येते. हे फळ रिकाम्या पोटीही खाऊ शकता. नाशपाती हे कमी उष्मांक असलेले फळ आहे आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीराला हायड्रेट ठेवते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी नाशपातीचे सेवन केले जाऊ शकते. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पेर खाल्ल्यामुळे वजन कमी होते. 

केळी

केळीच्या संदर्भात असे म्हटले जाते की ते खाल्ल्याने वजन वाढते. पण, केळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजन वाढत नाही तर वजन कमी करण्यात प्रभावी ठरते. यामध्ये भरपूर फायबर असून पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. केळी वजन कमी करण्यास मदत करते तसेच ते वजन वाढवण्यासही मदत करतात. त्यामुळे जाणून घ्या त्याची खाण्याची योग्य पद्धत. 

किवी

फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असलेल्या फळांमध्ये किवीचाही समावेश होतो. याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही त्याचा परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी वरील सगळी फळे तुम्हाला मदत करतात. फक्त आहारात या फळांचा कसा आणि कधी समावेश करायचा, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)