Mumbai Air Pollution: सध्या मुंबईतही प्रदुषणाची समस्या वाढू लागली आहे त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणे तितकेच (Air Pollution in Mumbai) महत्त्वाचे झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईची हवा (Mumbai Air Quality) ही दिल्लीपेक्षाही तिप्पट खराब झाली आहे. त्यातून आता थंडीचा मौसम असल्याकारणानं सगळीकडेच हवेचा दर्जा (Air Quality) प्रचंड खराब झाला आहे. त्यातून हे प्रदुषण आपल्या आरोग्यासाठीही विषकारक ठरते आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. आपल्याला प्रदुषणामुळे श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यातून आपल्याला काही गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. तेव्हा आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत घरातही स्वच्छता ठेवणे अनिवार्य आहे. आपल्याला घरातही धुळ आणि धुलिकण (Fog in Mumbai) येऊ शकतात त्यामुळे त्याप्रमाणे मुळातच आपल्या घरातील स्वच्छता ठेवणे अनिवार्य आहे. (How to Protect Yourself from Air Pollution otherwise risk of serious health problems)
प्रदुषणात आपल्याला दुषित हवेमुळे मोठ्या प्रमाणात श्वसनाचे रोग असतात. सर्दी हा सगळ्यांना होणारा कॉमन आजार आहे. त्यातून घसा खवखवणे, खोकला होणे. सर्दी - पडसं यांमुळे (Cold and Fever) तुम्हाला अनेक त्रास होऊ शकतात. आस्थमा (Asthama), न्यूमोनिया, टीबी, दमा, डायबेटिज आणि एलर्जी अशा काही काही गंभीर आजारांचीही लक्षणे तुमच्या शरीरात दिसू लागतात.
तुम्हाला जर का आधीपासूनच श्वसनाचे आजार असतील आणि बाहेर प्रदुषण असेल तर चुकूनही जास्त वेळासाठी बाहेरच्या वातावरणात फिरू नका. त्यानं तुमचा आजार वाढू शकतो. जरा का बाहेर फिरायचे असेलच किंवा काही महत्त्वाचे काम असेल तर मास्क घाला. त्याचसोबतच आपल्या डोळ्यांची आणि कानांचीही काळजी घ्या. अशावेळी त्वचाही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याप्रकारे स्वत:ची काळजी घ्या. खासकरून योगा (Yoga and Diet) करा आणि व्यायाम करा आणि आपल्या आहारात जंक फूड टाळा.
संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे कारण दिल्लीचा हवा निर्देशांक 118 नोंदवण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक प्रदूषित ते अतिप्रदूषित या स्थितीत आहे. चेंबूर, बीकेसी, भांडूप, अंधेरी, मालाड, कुलाबा, बोरिवली, वरळीतली हवा धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना या विषयावर ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम मुंबईकरांना भोगावा लोगतो आहे.