चंद्रपूर : निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने यशस्वी कामगिरी केली असली तरी त्यांच्या मंत्र्याचा पराभव झाला आहे. चंद्रपूरमधून निवडणूक लढवत असलेले हंसराज अहिर यांना काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी हरवलं आहे.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा २,३६,२६९ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
हंसराज अहिर | भाजप | ५,०८,०४९ |
संजय देवतळे | काँग्रेस | २,७१,७८० |
वामनराव चटप | आप | २,०४,४१३ |
हंसराज कुंभारे | बसपा | ४९,२२९ |
प्रमोद सोरटे | अपक्ष | १०,९३० |
२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.