close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election results 2019: बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती.

Updated: May 23, 2019, 08:12 PM IST
Election results 2019: बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय

बुलडाणा : बुलडाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांना मात दिली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या. 

अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.

हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती. प्रतापराव जाधव यांचा सामना राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांच्याशी झाला. वंचित बहुजन आघाडीकडून बुलडाण्यामध्ये बळीराम सिरस्कर रिंगणात होते.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये बुलडाण्यातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंचा १,५९,५७९ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

प्रतापराव जाधव शिवसेना ५,०९,१४५
कृष्णराव इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस ३,४९,५६६
अब्दुल हफीज बसपा ३३,७८३
बाळासाहेब दराडे अपक्ष २९,७९३
नोटा   १०,५४६