वर्धा : वर्ध्यामध्ये भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली होती. रामदास तडस यांचा सामना काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्याशी झाला. वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी उमेदवार होते.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये वर्ध्यातून भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या दत्ता मेघेंचा २,१५,७८३ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
रामदास तडस | भाजप | ५,३७,५१८ |
दत्ता मेघे | काँग्रेस | ३,२१,७३५ |
चेतन पेंडाम | बसपा | ९०,८६६ |
मोहम्मद अलीम पटेल | आप | १५,७३८ |
श्रीकृष्ण उबाळे | एआरपी | ६,४०५ |