नारायण राणेंचा अजित पवारांवर 'प्रहार'

नारायण राणेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका करत ट्विट केले आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 24, 2018, 10:44 PM IST
नारायण राणेंचा अजित पवारांवर 'प्रहार' title=

मुंबई : नारायण राणेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका करत ट्विट केले आहे. 

अजित पवारांनी माझी चिंता करू नये. मी आगीतून फोफाट्यात पडलेली नाही. उलट अजित पवारांनी बांधलेली धरण भरलीच नाहीत. तर तेच स्वतः तुडूंब भरले आहेत अशा शब्दात ट्विक करत नारायण राणेंनी अजित पवारांवर प्रहार केला आहे. 

काही दिवसांपूर्वी काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश आलं असलं तरी माळेगाव ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवण्यास राष्ट्रवादीला अपयश आलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा टपरीवरचा चहा पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याप्रमाणेच नारायण राणेंच हे ट्विट देखील सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे.