Fact Check : भर रस्त्यावर अवतरले भगवान शिव

एका कावड यात्रेतील व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत चक्क शिवशंकरानं (Lord Shiva) कावड यात्रेत भक्तांना दर्शन दिलंय.

Updated: Jul 28, 2022, 11:15 PM IST
Fact Check : भर रस्त्यावर अवतरले भगवान शिव title=

मुंबई : बातमी आहे एका (Viral Video) व्हायरल व्हीडिओची. एका कावड यात्रेतील व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत चक्क शिवशंकरानं (Lord Shiva) कावड यात्रेत भक्तांना दर्शन दिलंय.असं काय आहे या व्हीडिओत पाहुयात. (fact check viral polkhol lord shiva video viral on social media)

श्रावण महिना सुरू झाल्याने लाखो कावडिया कावड यात्रेत निघालेयत. पण, या यात्रेदरम्यान एका भाविकानं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. या भक्तानं काय केलं पाहा. थेट कावड यात्रेदरम्यान यानं भगवान शिवालाच खांद्यावरून आणलं. यानं भगवान शंकराची मूर्ती तयार केली. आणि उचलायलाही हलकी अशी मूर्ती घेऊन हा कावडयात्रेत सहभागी झाला.

मूर्ती उचलून नेताना थकायला झालं तर त्याचीही व्यवस्था यानं केलीय. हा भक्त वाटेत बसण्यासाठी स्टूल घेऊन आलाय.चालून थकला की हा थोडा वेळ ही मूर्ती स्टूलावर बसवतो. विश्रांती घेऊन झाली की पुन्हा मूर्ती खांद्यावर घेऊन पुढच्या प्रवासाला लागतो. यानं हा स्टूल सोबत नेण्याचीही व्यवस्था केलीय. स्टुलाला दोरी बांधून हा खांद्याला अडकवतो आणि यात्रेत निघतो. या मूर्तीचं रस्त्यावरच मोठ्या संख्येनं भाविक दर्शनही घेतात. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.