आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.

Updated: Mar 18, 2017, 06:15 PM IST
आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...  title=

मुंबई : महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.

आरोग्यासंदर्भातील तरतुदी...

- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील ग्रामीण जनता, महिला व बालके यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी 1 हजार 549 कोटी रु. निधीची तरतूद

- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित, यासाठी 1 हजार 316 कोटी रु. निधीची तरतूद

- सर्वसामान्य रुग्णांना अचूक रोगनिदानासाठी 31 रुग्णांलयांमध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करण्याचा निर्णय... यासाठी 77 कोटी 50 लक्ष रु. निधीची तरतूद

- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत 50 हजार पर्यत लोकासंख्या असलेल्या शहरांमध्ये उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 211 कोटी रु. निधीची तरतूद

- स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मुखकर्करोगांच्या 253 शासकीय आरोग्य संस्थामध्ये मॅमोग्राफी मशीन, कोल्पोस्कोप व व्हेलस्कोप मशीन  उपलब्ध करणार, यासाठी 43 कोटी रु. निधीची तरतूद

- औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून राज्यस्तरीय कर्करोग संशोधन संस्थान निर्माण करण्याचा निर्णय, यासाठी 126 कोटी रु. निधीची तरतूद

- राज्यातील कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार नजिकच्या अंतरावर उपलब्ध होण्याकरीता महसूल विभाग निहाय कर्करोग उपचार केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णांलयांचे बांधकाम तसेच बळकटीकरणासाठी 559 कोटी 30 लक्ष रु. निधीची तरतूद

- महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात आढळून येत असलेल्या माकडताप या रोगाच्या  निदान आणि उपचारासाठी निधीची तरतूद

-  प्रशिक्षण व संशोधन यासाठी साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्याचा निर्णय