www.24taas.com, मुंबई
आर्थिक सुधारणांच्या मुद्यावर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होतेय. त्याअगोदरच शेअर बाजारानं आज उसळी घेतलेली पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं जुलै २०११ नंतर आज १९ हजारांचा टप्पा पार केलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयानंही आपलं स्थान मजबूत केलंय. गेल्या साडे पाच महिन्यांतला उच्च दर रुपयानं पुन्हा मिळवलाय.
पंतप्रधान मनमोहनसिंग आजच्या कॅबिनेट मिटींगमध्ये धाडसी निर्णय घेण्याच्या शक्यतेमुळं शेअरबाजारात तेजी आलीये. आर्थिक सुधारणांचे आणखी काही निर्णय अपेक्षित आहेत. विमा, कंपनी कायद्यांच्या सुधारणा विधेयकांना आज मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. साहजिकच, शेअर बाजाराकडून जोरदार स्वागत होतंय हे स्वागत आज सेनेक्सच्या आकड्यांवरून दिसूनही येतंय. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं १९ हजारांच्यावर झेप घेतली. डॉलरचा विनिमय दर ५१.९४ रुपये झालाय.