मुंबई : पाकिस्तानविरोधातील आंदोलनाची धार शिवसेनेने जोरदार लावल्याने मित्र पक्ष भाजपने शिवसेनेवर तोंडसुख घेण्याचा धडाका लावलाय. याला शिवसेनेने आपल्या भाषेत उत्तर दिलेय. ज्यांची लायकी नाही, त्यांनी आम्हाला गोष्टी शिकवू नये, असाच इशारा दिलाय.
अधिक वाचा : शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी
शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले आहे. जे शिवसेनेच्या विरोधात बोलतायत त्यांनी पाकिस्तानला जावं, असंही फर्मान मंत्री कदम यांनी काढलेय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याची यांची लायकी तरी आहे का. टिनपाट नेत्यांनी भान राखावे. कोण हा आशिष....त्याला कोण विचारतोय. असे सांगत, सूर्यावर थूंकणे म्हणजे स्वत:वरच थूकी पडणे होय, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी आशिष शेलार यांच्यावर केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.