मुंबई : टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटसाठी खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र ही संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू शिखर धवनला ही संधी मिळाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जात नाही. त्याला जाणीवपूर्वक बाहेर ठेवलं जात आहे.
टीम इंडियात निवड होणे जितके कठीण मानले जाते, तितकेच स्वतःला संघात टिकवून ठेवणे कितीतरी पटीने कठीण असते. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाच्या ओपनिंग फलंदाज शिखर धवनसोबत घडला आहे.
धवन 2018 पासून कसोटी क्रिकेटमधून बाहेर आहे. आता त्याचे पुनरागमन करणे कठीण झालं आहे. 2018 मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीममधून खेळण्याची संधी दिली नाही. त्याला निवड समितीनं कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली नाही.
कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणार?
शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. आता शिखर धवन गेला काही दिवस टीम इंडियातून कसोटी फॉरमॅटमध्ये खेळताना दिसला नाही. शिखर धवनच्या जागी के एल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना जास्त संधी दिली जात आहे.