India vs England 2nd Test Latest News : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) द्विशतकीय खेळी, शुभमन गिलचं (Shubman Gill) दमदार शतक आणि बुमराहच्या (Jasprit Bumrah) घातक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या बेझबॉलचा कचरा झाला. बुमराहने दोन्ही डावात मिळून एकूण 9 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने चौथ्या दिवशी सामना खिशात घातला.
पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या (Yashasvi Jaiswal double century) जोरावर टीम इंडियाने 396 धावांची मोठी आघाडी उघडली होती. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली. इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर खल्लास झाला. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक कामगिरीमुळे टीम इंडियाला बाजी मारता आली. त्यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली होती. अशातच आता दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकीय खेळीमुळे (Shubman Gill century) टीम इंडियाला 255 धावा करता आल्या. इंग्लंडला विजयासाठी 399 धावा करायच्या होत्या. मात्र, आश्विन आणि बुमराहने अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने टीम इंडियाला 106 धावांनी विजय मिळवता आला आहे.
इंग्लंडची कडवी झुंज
इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगलंच कडवी टक्कर दिल्याचं पहायला मिळालं. जेम्स अँडरसनने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. तर इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅक क्राउली आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडला तारल्याने यजमानांना 250 पार करता आल्या. मात्र, इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात डोकं वर करु दिलं नाही. स्पिनर्सचा मारा करत बेन स्टोक्सने भारतावर पहिल्यांदाच पकड मिळवली होती. तिथून इंग्लंड त्यांच्या बेझबॉल टेकनिकने सामना जिंकेल, अशी शक्यता होती. मात्र, रोहितने बुमबुम टेकनिकच्या आधारे इंग्रजांच्या दांड्या उडवल्या.
Jasprit Bumrah wraps things up in Vizag as #TeamIndia win the 2nd Test and level the series #TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KHcIvhMGtD
— BCCI (@BCCI) February 5, 2024
इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.