आयपीएल 2019 | हिटमॅन रोहित शर्माच्या टी-२० मध्ये ८ हजार रन पूर्ण

गुरुवारी दिल्ली विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रनने विजय झाला.   

Updated: Apr 19, 2019, 09:46 AM IST
आयपीएल 2019 | हिटमॅन रोहित शर्माच्या टी-२० मध्ये ८ हजार रन पूर्ण title=

दिल्ली : मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावे एक नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार रन पूर्ण करण्याची कामगिरी रोहित शर्माने केली आहे. रोहित शर्माने ही कामगिरी गुरुवारी दिल्ली विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  केली. त्यामुळे ८ हजार रन पूर्ण करणारा रोहित हा जगातील आठवा आणि भारतातील तीसरा बॅट्समन ठरला आहे. या ८ हजार रन केवळ आयपीएलमधल्या नाहीत. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या टी-२० मॅचमधील रनचा देखील समावेश आहे.

 

शुक्रवारी दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यात मॅच खेळण्यात आली. यात रोहितने २२ बॉलमध्ये ३० रन केल्या. रोहितला ८ हजार रनांचा टप्पा गाठण्यासाठी ३०७ टी-२० मॅच खेळाव्या लागल्या. दिल्ली विरुद्ध खेळण्याआधी रोहितला केवळ १२ रनची गरज होती. रोहितने क्रिस मॉरिसला फोर मारुन त्याने आपल्या ८ हजार रन पूर्ण केल्या. रोहितच्या ८ हजार रन पैकी ४ हजार ७१६ रन या आयपीएल मध्ये केल्या आहेत. आयपीएल मध्ये सर्वाधिक रन करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सुरेश रैना हे दोघे रोहित शर्मापेक्षा अग्रस्थानी आहेत.

रोहितच्या आधी भारताकडून ८ हजार रनचा टप्पा सुरेश रैना आणि कॅप्टन विराट कोहलीने पूर्ण केला आहे. सुरेश रैनाच्या टी-२० मध्ये ८ हजार २१६ रन आहेत. रैनाने या रन ३११ मॅचमध्ये केल्या आहेत. विराट कोहलीने ८१८३ रन केल्या आहेत. विराट कोहलीने शुक्रवारी कोलकाता  विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ८ हजार रन पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकूण २६० टी-२० मॅच खेळल्या आहेत. 

टी-२० मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा नंबर लागतो. ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल १२ हजार ६७० रन केल्या आहेत. गेल आतापर्यंत ३७९ टी-२० मॅच खेळला आहे. गेलची १७५ नॉट आऊट ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्याने २०१३ साली आयपीएल मध्ये पुण्याविरुद्ध केली होती. गेलनंतर सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमचा नंबर लागतो. मॅक्युलमने ३७० मॅच खेळल्या आहेत. यात त्याने ९ हजार ९२२ रन केल्या आहेत. तर पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने ३४५ मॅचमध्ये ८ हजार ७०१ रन केल्या आहेत.

दिल्ली विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रनने विजय झाला. दिल्लीला विजयासाठी १६९ रनचे आव्हान दिले होते. या मोबदल्यात दिल्लीला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १२८ रन करता आल्या. या विजयामुळे मुंबई अंकतालिकेत १२ पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत ९ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी ६ मध्ये विजय मिळवला आहे, तर ३ मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईची पुढील मॅच ही शनिवारी २० एप्रिलला खेळला जाणार आहे.