पोलीस

मुंबईत वन वेवरुन वाद, पोलीस- स्थानिक आमने-सामने

शहरातील  सिद्धीविनायक मंदिर समोर एक वेगळाच वाद निर्माण झाला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे चित्र दिसून आले. वन वे रस्ता करण्यासाठी पोलीस कुमक आली असताना स्थानिकांना वाद घातला.

Jul 11, 2017, 03:40 PM IST

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी पिता-पुत्रांना अटक

टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.

Jul 8, 2017, 11:36 AM IST

मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?

मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?

Jul 6, 2017, 09:36 PM IST

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

Jul 6, 2017, 09:06 PM IST

मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?

उड्डाणपुलाखालची जागा 'नो पार्किंग घोषित करून दोन दिवस उलटले तरीही पार्किंग सुरूच आहेत. महापालिका, पोलीस कारवाईसाठी नेमकी कोणाची वाट पाहात आहेत हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. 

Jul 6, 2017, 08:12 PM IST

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने अटक

गोरेगावमधील सोनसाखळी चोरी प्रकरणातील आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने मालाड येथील बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. 

Jul 6, 2017, 08:07 AM IST

न्यायालयीन कोठडीतील आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट

न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या आरोपीला चक्क सोलापूर पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात असल्याचा भयावह प्रकार नंदूरबारमध्ये समोर आला आहे. 

Jul 5, 2017, 11:02 AM IST

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यात जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांचाही समावेश आहे.

Jul 1, 2017, 10:27 PM IST

पोलिसाची बारमध्ये तोडफोड, सीसीटीव्ही मध्ये कैद, गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील देवंग्रा येथे एका पोलिस कर्मचाऱ्यानेच बियरबारमध्ये तोडफोड आणि मारहाण करीत धुडघुस घातल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

Jun 23, 2017, 08:34 PM IST

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

Jun 23, 2017, 01:11 PM IST

फसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध

ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला. 

Jun 20, 2017, 10:05 PM IST

ड्युटीवर असणाऱ्या पोलिसावर हल्ला, गंभीर जखमी

कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आलीय. नंदूरबारमध्ये ही घटना घडलीय. 

Jun 20, 2017, 03:28 PM IST

पोलीसांच्या झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

 महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये रविवारी दुपारी 3च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.. 

Jun 19, 2017, 03:54 PM IST