भारत

डेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात जुंपली

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या क्रिकेट टेस्टमध्ये शुक्रवारी आक्रमकता दिसून आली. नो बॉलवर बोल्ड झालेल्या वॉर्नरला अंपायरने परत बोलविल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात बाचाबाची झाली.

Dec 12, 2014, 01:39 PM IST

सचिन, धोनी, गांगुली, द्रविडला नाही जमले, ते विराटने करून दाखवले

 भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे. 

Dec 11, 2014, 05:12 PM IST

बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Dec 11, 2014, 08:42 AM IST

मलाला माझी पाकिस्तानी मुलगी, मी तिचा भारतीय पिता - कैलाश सत्यार्थी

मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले. 

Dec 10, 2014, 07:15 PM IST

भारत- पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच - मलाला

 भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय.

Dec 10, 2014, 03:30 PM IST

गूगलचा ‘नेक्सस ६’ भारतात!

गूगलनं आपला बहुचर्चित स्मार्टफोन नेक्सस-६ भारताच्या बाजारात उतरवलाय. आजपासून (बुधवार) हा भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. 

Dec 10, 2014, 07:54 AM IST

भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन!

 

पेशावर : भारत आणि महागाई हे समीकरण जरी न सुटणारे असले तरी भारतामुळं इतरांची महागाई मात्र दूर झाली आहे. भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानातील कॉमन मॅनला अच्छे दिन आले आहेत. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळं पाकिस्तानातील महागाईची समस्या दूर झाली आहे.

Dec 9, 2014, 06:57 PM IST

अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

Dec 9, 2014, 02:35 PM IST

ह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू

 दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे. 

Dec 8, 2014, 06:30 PM IST

भारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी

मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.

Dec 6, 2014, 11:03 AM IST

अॅडलेड टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 

Dec 2, 2014, 01:41 PM IST