भारत

देशातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी

हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

Oct 25, 2014, 07:38 AM IST

विराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.

Oct 21, 2014, 03:27 PM IST

अर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!

विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.

Oct 18, 2014, 07:49 AM IST

बांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व

भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Oct 16, 2014, 08:37 PM IST

भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Oct 16, 2014, 04:52 PM IST

पाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...

नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...  

Oct 16, 2014, 01:10 PM IST

वेस्टइंडिज विरुद्धच्या दोन वनडे भारतीय टीमची घोषणा

 भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (बीसीसीआय)ने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन लीनमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. 

Oct 14, 2014, 08:27 PM IST

पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

Oct 14, 2014, 03:25 PM IST

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST

पाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव

जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.

Oct 12, 2014, 03:50 PM IST

गुगलची डूडलद्वारा आरके नारायण यांना श्रद्धांजली

गुगल वापरणाऱ्या नव्या पिढीतील अनेकांना आरके नारायण यांचं नाव ठाऊक नसेल, आरके नारायण हे एक ख्यातनाम लेखक आहेत, त्याचं मालगुडी डेज नावाचं एक पुस्तक होतं, यात त्यांनी 'मालगुडी' हे त्यांच्या स्वप्नातलं गाव वसवलंय.

Oct 10, 2014, 07:38 PM IST

भारतात लॉन्च होतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ४

नवी दिल्लीः सॅमसंगचा बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आज भारतामध्ये लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी बर्लिनमध्ये सर्वात आधी आयएफए टेक शोमध्ये त्याचा डिस्प्ले केला होता. भारतात याच्या किमतीचे अंदाज काढले जात आहे. पण, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत असेल.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ४चे फीचर्स

Oct 10, 2014, 03:14 PM IST