भारत

'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार'

काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

Nov 20, 2014, 08:21 PM IST

मोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट'

 देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना,  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.

Nov 20, 2014, 08:09 PM IST

इंटरनेटमध्ये भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकणार

इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Nov 19, 2014, 06:55 PM IST

काळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा

जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली. 

Nov 17, 2014, 08:09 AM IST

भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!

नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. 

Nov 17, 2014, 07:59 AM IST

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा अवमान, PM समोर चुकीचा नकाशा

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.  

Nov 14, 2014, 05:41 PM IST

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेत. ब्रिस्बेन विमानतळावर मोदींचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.

Nov 14, 2014, 09:13 AM IST

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत 

Nov 14, 2014, 08:16 AM IST

भारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम

रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.

Nov 13, 2014, 10:28 PM IST

विक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले.

Nov 13, 2014, 07:55 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Nov 13, 2014, 07:27 PM IST