सुषमा स्वराज

ललित मोदी विजा प्रकरण, सरकार सुषमा स्वराज यांच्या पाठिशी

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोपात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठिशी सरकार उभं राहिलंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली. सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 14, 2015, 04:40 PM IST

ललित मोदींना मदत केल्याने स्वराज अडचणीत

ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल्स व्हिसा देण्यास मदत केल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. ललित मोदी हे आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत.

Jun 14, 2015, 03:05 PM IST

आता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज

भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले. 

May 31, 2015, 07:44 PM IST

माझ्या भारतीय मुलाला वाचवा ट्विटनंतर सुषमा स्वराज मदतीला

सध्या येमेन देशात अशांतता निर्माण झाली आहे. देशात हिंसाचार सुरुच आहेत. यामध्ये एक आठ महिन्यांचा बालक फसला गेला. त्याच्या आईने आपली धास्ती ट्विटवर व्यक्त केली. हा ट्विट थेट विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत माय-लेकांना सुखरुप भारतात आणले.

Apr 7, 2015, 03:57 PM IST

गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यास नकवींचा पाठिंबा

 भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा प्रस्ताव सुषमा स्वराज यांनी ठेवल्यानंतर टीएमसीनंतर आता बीएसपी सुप्रीमो मायावती यांनीही टीकेची झोड उठवली आहे.

Dec 8, 2014, 10:06 PM IST

इराकमधील बेपत्ता भारतीयांचा शोध सुरु - सुषमा स्वराज

इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.

Nov 28, 2014, 06:59 PM IST

बाळासाहेबांना हयातीत कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही : स्वराज

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीका करतांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला, भाजपला अफझलखानाची फौज म्हटल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Oct 9, 2014, 07:57 PM IST

‘मातोश्री’ची मर्यादा ओलांडू नका - सुषमा स्वराज

सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी टीका केलीय. आमच्या प्रचार यंत्रणेला ‘अफजल खाना’ची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ भवनाची मर्यादा ओलांडू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Oct 9, 2014, 10:38 AM IST

सुषमा स्वराज यांच्या बहिणीची संपत्ती - 33 करोड रुपये

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमदवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची बहिण वंदना शर्मा यांच्याकडे तब्बल 33.06 करोड रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलंय. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंदना यांनी आपली ही संपत्ती घोषित केलीय. 

Sep 26, 2014, 01:29 PM IST

सुषमा स्वराज यांनी अमेरिकेच्या केरींना खडसावलं

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन केरी यांनी काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांमधला हा पहिलाच वार्तालाप आहे.

Aug 1, 2014, 11:16 AM IST

स्वराज ठरल्या देशाच्या पहिल्या 'महिला परराष्ट्र मंत्री'

मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हातात घेणाऱ्या सुषमा स्वराज या ‘देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री’ ठरल्यात.

May 27, 2014, 05:14 PM IST

सुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.

Apr 4, 2014, 07:41 PM IST

भाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

Mar 23, 2014, 08:17 PM IST