'बजरंगी भाईजान'चे वादळ, ६०० कोटी कमावले, आमीरचे रेकॉर्ड तोडणार का?
सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडत ६०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Aug 18, 2015, 07:57 PM ISTकमाईचा रेकॉर्डब्रेक 'बजरंगी भाईजान' सिनेमाचं सत्य अखेर उघड...
ईदचा मुहूर्त साधून प्रदर्शित झालेल्या आणि रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'बजरंगी भाईजान'बद्दल आता एक नवीन खुलासा झालाय... महत्त्वाचं म्हणजे, हा खुलासा दुसरा - तिसरा कुणी केला नसून या सिनेमाचा अभिनेता सलमान खान यानंच हा भांडाफोड केलाय.
Aug 13, 2015, 04:22 PM IST'बजरंगी भाईजान' विरुद्ध 'बाहुबली', कोण जिंकणार बॉक्स ऑफिसचा लढा?
सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि प्रभाषचा बाहुबली दोन्ही चित्रपटांनी कमाईत जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केलाय. पण बॉक्स ऑफिसवर कोणाचं वर्चस्व राहणार... चला जाणून घेऊ...
Aug 9, 2015, 04:34 PM IST'बजरंगी भाईजान'ची बॉक्स ऑफीसवर धूम, सर्वाधिक कमाईतील दुसऱ्या क्रमांकावर
अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' याने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा जादुई आकडा पार करत 'पीके'नंतर भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे.
Aug 7, 2015, 01:18 PM IST२३ दिवसांत 'बाहुबली' ५०० कोटींजवळ, तर 'बजरंगी' ३०० कोटी गाठणार
स्पेशल इफेक्ट्स आणि रोमांचानं भरलेला चित्रपट 'बाहुबली' बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. या सुपरहिट चित्रपटानं अवघ्या २३ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर जगभरात ४८५ कोटींची कमाई केलीय.
Aug 3, 2015, 02:27 PM ISTभेटा, रिअल लाईफ 'बजरंगी भाईजान'ला!
सलमान खानचा बहुचर्चीत 'बजरंगी भाईजान' तुम्ही एव्हाना पाहिलाच असेल... सलमाननं रिल लाईफमध्ये जगलेली भूमिका चंदीगडच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं रिअल लाईफमध्ये जगलीय.
Aug 1, 2015, 04:48 PM ISTसलमान खानचा बजरंगी भाईजान पार करणार ५०० कोटींचा टप्पा
सलमान खान हा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसचा जादूगर असल्याचं पुन्हा त्याने सिद्ध केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण इतर खानांपेक्षा अधिक यशस्वी असल्याचे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं आहे. आता त्याने बजरंगी भाईजानच्या माध्यमातून आपलं त्याने ही किमया करून दाखवली आहे.
Jul 31, 2015, 08:12 PM ISTपाहा 'बजरंगी भाईजान'मधील पडद्यामागची 'मुन्नी'
'बजरंगी भाईजान' चित्रपटातील 'मुन्नी'च्या भूमिकेने हर्षाली मल्होत्रा बालकलाकार म्हणून चर्चेला आली आहे. हर्षाली मल्होत्राचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.
Jul 29, 2015, 01:26 PM ISTयाकूबवरील ट्विट वादानंतर सलमानच्या 'बजरंगी'च्या कमाईत घट?
११९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या बाजूनं ट्विटकरून वाद ओढवणं कदाचित सलमानच्या फॅन्सना आवडलेलं दिसत नाही. कारण बॉक्स ऑफिसवर सलग जबरदस्त कलेक्शन करणारा चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची कमाई सोमवारी जरा कमी झालेली दिसली.
Jul 28, 2015, 10:10 PM ISTबजरंगीने दिले 'बाहुबली'ला धोबीपछाड, कमाईत टाकले मागे
सुपरस्टार सलमान खान याला बॉक्स ऑफिसचा दबंग म्हटले जाते, ते त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ईदला रिलिज झालेल्या सलमानच्या 'बजरंगी भाईजान'ने दाक्षिणात्य चित्रपट बाहुबली'ला मागे टाकले आहे.
Jul 27, 2015, 06:26 PM ISTसलमाननं अखेर म्हटलंच... 'आय लव्ह यू टू'
अभिनेता सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा पाहिल्यानंतर हमसून हमसून रडणाऱ्या चिमुरड्या 'सुझी'ला सलमाननं एक गोड मॅसेज दिलाय.
Jul 25, 2015, 04:00 PM ISTव्हिडिओ: 'बजरंगी भाईजान' पाहून 'ती' हमसून-हमसून रडली
सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा जलवा अजूनही कायम आहे. या चित्रपटानं लहान मुलांचंही मन जिंकलंय. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ लिंक शेअर केलीय.
Jul 24, 2015, 12:27 PM IST'बजरंगी'ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं
बजरंगी भाईजान चित्रपटाने दीडशे कोटी पर्यंत घौडदौड केली आहे, पहिल्या आठवड्यात शंभर कोटींचा टप्पा 'बजरंगी भाईजान'ने पार केला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'बजरंगी'ने कमाल केली आहे, रविवारी बजरंगी भाईजानने तब्बल ३९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
Jul 22, 2015, 03:49 PM ISTपाहा काय आहे 'बजरंगी भाईजान' आणि बाहुबलीमधील खास कनेक्शन
सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते म्हणजे के. वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या दोन्ही चित्रपटांची कथा लिहिलंय.
Jul 20, 2015, 06:58 PM ISTपहिल्याच आठवड्यात 'बजरंगी भाईजान'नं केली १०० कोटींची कमाई
'ईद'च्या निमित्तानं रिलीज झालेला सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच १०२.६ कोटींची कमाई केलीय. यासोबतच १०० कोटींचा गल्ला जमवणारा सलमानचा हा आठवा चित्रपट ठरलाय.
Jul 20, 2015, 06:32 PM IST