isis

ISIS वर आता जर्मनी करणार लष्करी कारवाई

फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी  लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.

Dec 5, 2015, 11:35 PM IST

इसिसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी

इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरविल्यानंतर इसिसने आता भारताविरोधात युद्धाची घोषणा केलीय. इसिसने 'फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल' या पुस्तकात ही घोषणा केलीये. यासोबतच यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही देण्यात आली आहे. 

Dec 3, 2015, 12:13 PM IST

रशियाने तोडले आंतरराष्ट्रीय नियम, सीरियावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला

ISISला जेरीस आणण्यासाठी रशियाने कडक पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीरियातील ISISचे मुख्यालाय असलेल्या राक्का शहरावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. 

Dec 1, 2015, 04:09 PM IST

आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना

हेमंत महाजन / फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे.

Nov 30, 2015, 08:58 PM IST

कार्टुन छापल्याप्रकरणी लोकमत वृत्तपत्रावर हल्ला

वादग्रस्त कार्टुन छापल्याप्रकरणी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तसेच लोकमतच्या प्रती महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाळण्यात आल्याचाही प्रकार घडला. 

Nov 30, 2015, 01:23 PM IST

ISI ला माहिती पुरवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

ISI ला माहिती पुरवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Nov 30, 2015, 11:03 AM IST

जेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो.

सिरियामध्ये आयसीसच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दहशदवादी मिनी ट्रकच्या मागच्या बाजूस बसला असून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. 

Nov 29, 2015, 07:02 PM IST

एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Nov 28, 2015, 03:19 PM IST

ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार

तुर्कीमध्ये लढाऊ विमान पाडल्यानंतर ISISचा दहशतवादी या विमानाचे व्हिडिओ शुटींग करत होता. त्याचवेळी डागण्यात आलेल्या मिसाईलच्या स्फोटात तो ठार झाला.

Nov 28, 2015, 02:25 PM IST

पॅरिस हल्ल्यानंतर 'इसिस'नं घेतलाय 'अॅनोनिमस'शी पंगा!

 फ्रान्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं अनपेक्षितरित्या स्वत:साठी आणखी एक शत्रू निर्माण केलाय

Nov 28, 2015, 10:46 AM IST

या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले....

कैदींना नदी किनारी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार करून त्यांना नदीत टाकून देणाऱ्या आयसिसला एका मुस्लिम देशाने जाहीररित्या आव्हान दिले आहे.

Nov 27, 2015, 06:09 PM IST

महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!

सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

Nov 27, 2015, 01:18 PM IST

ISISच्या पोस्टर गर्लची दहशतवाद्यांकडून हत्या

ऑस्ट्रेलियातून घरुन पळून जाऊन ISISमध्ये दाखल झालेल्या समरा केसिनोविकची (१७) हिची हत्या केल्याचे पुढे आलेय. दहशतवाद्यांनीच तिची हत्या केली. ती इसिसच्या कारभालाला कंटाळलेली होती. ती पळून जाण्याच्या तयारीत असताना तिचा गेम केला.

Nov 25, 2015, 07:54 PM IST

भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए

'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे. 

Nov 25, 2015, 10:09 AM IST