isis

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST

23 वर्षीय तरुणी बनली ‘इसिस’ची ट्विटर स्टार

जेनिफर विल्यम्स... टेक्सास प्रांतातील ही 23 वर्षीय परदेशी धोरण संशोधक तरुणी सध्या भलतीच चर्चेत आलीय. ती ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी तिला घातलेल्या लग्नाच्या मागणीमुळे...

Oct 6, 2014, 02:48 PM IST

'इसिस'च्या क्रूरतेचा चौथा बळी; आता हेनिंगचं मुंडकं छाटलं

दहशतवादी संघटना ‘इसिस’नं (ISIS) पुन्हा एकदा एका निरपराध व्यक्तीचं मुंडकं छाटून त्याची हत्या केल्याचा दावा केलाय. इसिसनं जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये ब्रिटनचा नागरिक असलेल्या आणि बंधक बनवलेल्या एलन हेनिंग याचं शीर धडापासून वेगळं करण्यात आल्याचं दिसतंय. 

Oct 4, 2014, 12:07 PM IST

‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं... 

Sep 24, 2014, 05:22 PM IST

अमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला

isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

Sep 23, 2014, 12:53 PM IST

'जन्नत' मिळवण्यासाठी ती बनलीय 'जिहादी दुल्हन'

ब्रिटनच्या ग्लासगोमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीनं 'जन्नत' मिळवण्यासाठी दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'ची (ISIS) वाट धरलीय. 'आयएसआयएस'च्या एका दहशतवाद्यासोबत लग्न करण्यासाठी या तरुणीनं आपलं घर सोडलंय. 

Sep 10, 2014, 05:48 PM IST

‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं

जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराच्या शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ जाहीर करणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं आता अमेरिकेच्या आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद केलाय.

Sep 3, 2014, 08:51 AM IST

'इसिस'मध्ये सहभागी झालेल्या कल्याणच्या तरुणाचा इराकमध्ये मृत्यू

कल्याणचा रहिवासी असलेल्या आरीफ मजीद या 'इसिस'मध्ये सहभागी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आलीय. 

Aug 27, 2014, 03:23 PM IST

इराकमध्ये ISISच्या विरोधात उतरली 'फीमेल आर्मी'!

ISIS इराकचा दुश्मन. पण आता इराकच्या सुखशांतीची धुळधाण करणाऱ्या दुश्मनांचा खातमा होणार आहे. इराकी सेनेबरोबरच आता कुर्दीस फिमेल आर्मीनं ISISच्या दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले आहेत. इराकमध्ये महिलांनी दुर्गा अवतार धारण केलाय..

Aug 23, 2014, 01:24 PM IST

भयंकर… पत्रकाराचं मुंडकं छाटून अमेरिकेला धाडला व्हिडिओ!

‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय. 

Aug 20, 2014, 01:43 PM IST

...ही क्रूरता पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल!

एका लहान मुलाच्या हातात रक्तानं माखलेलं, धडावेगळं झालेलं शिर पाहायला मिळालं तर... 

Aug 13, 2014, 02:15 PM IST

क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनही घाबरत होता 'बगदादी'ला...

क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनही घाबरत होता 'बगदादी'ला...

Aug 13, 2014, 10:14 AM IST