pm

‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांनी ही घोषणा केलीय.

Apr 13, 2013, 03:49 PM IST

गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल्याचं मोदींनी नमूद केलंय.

Apr 4, 2013, 11:37 PM IST

पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!

पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षी जेएनएनयूआरएम (JNNURM) च्या अंतर्गत केलेल्या कामा मूळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते केंद्राचा बेस्ट सिटी चा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्काराच मॅनेज करून घेतला होता, असा गंभीर आरोप करण्यात आलाय.

Mar 20, 2013, 08:27 PM IST

सरसंघसंचालकांचीही मोदींनाच साथ!

अलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Feb 7, 2013, 07:33 PM IST

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

2014 च्या पंतप्रधानपदाचे राजकारण आता महाकुंभ मेळ्यात येऊन पोहचलंय. 7 फेब्रुवारीला होणा-या संतांच्या महासंमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2013, 08:56 AM IST

एनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.

Dec 12, 2012, 04:50 PM IST

राहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.

Dec 2, 2012, 04:20 PM IST

मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.

Dec 1, 2012, 07:38 PM IST

जे केलं ते आम्हीच केलं – राहुल गांधी

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वकाही करणार असे सांगितले होते. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत असून, आम्ही अनेक गोष्टी करून दाखविल्या आहेत, असे काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सांगितले.

Nov 4, 2012, 04:15 PM IST

मोदी पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून बाहेर

२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्णय घेतला आहे.

Oct 23, 2012, 02:07 PM IST

अरुण शौरींचा भाजपला घरचा आहेर!

डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या केंद्रसरकारच्या धोरणाला भाजपचा विरोध असला तरी पक्षाचे वरिष्ठनेते अरूण शौरींनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत भाजपला घरचा आहेर दिलाय.

Sep 24, 2012, 11:21 AM IST

पंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध

देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

Sep 22, 2012, 01:02 PM IST

`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`

विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.

Sep 22, 2012, 10:31 AM IST

अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड

तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.

Sep 21, 2012, 04:59 PM IST

आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

Sep 21, 2012, 11:23 AM IST