pm

पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.

Oct 16, 2013, 01:44 PM IST

राहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकूम मागे...

कलंकीत लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणारा वटहुकूम अखेर केंद्र सरकारनं मागे घेतलाय. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

Oct 2, 2013, 06:57 PM IST

पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.

Oct 2, 2013, 01:13 PM IST

`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

Oct 2, 2013, 11:48 AM IST

`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर

दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.

Oct 1, 2013, 09:18 AM IST

देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी

पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.

Sep 29, 2013, 02:34 PM IST

देशात जातीय दंगली भडकवणाऱ्यांना माफी नाही-पंतप्रधान

देशात जातीय दंगली भडकवणाऱ्यांना माफी देणार नसल्याचा इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलाय.

Sep 23, 2013, 12:31 PM IST

सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग, पवारांचा मोदींवर थेट हल्ला

‘पंतप्रधानपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. स्वतःच्या सत्तेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे’ अशी थेट टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय.

Sep 21, 2013, 06:32 PM IST

मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडेन - लेखक डॉ. अनंतमूर्ती

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी देश सोडण्याची धमकी दिलेय.

Sep 21, 2013, 09:02 AM IST

ओबामा, मनमोहन सिंग आणि... मिस अमेरिका!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा... भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नुकताच मिस अमेरिकेचा खिताब आपल्या नावावर करणारी भारतीय वंशाची नीना दावुलुरी...

Sep 18, 2013, 03:33 PM IST

राहुलच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पंतप्रधान तयार

लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

Sep 7, 2013, 08:42 PM IST

देशात सास-बहू-दामादचा खेळ : नरेंद्र मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात सास-बहू-दामाद असं चित्र दिसत आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांना लाल किल्ल्यावरून धीर देण्यात आलेला नाही, येथेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, अशी टीका मोदी यांनी भूजमधील महाविद्यालयातील भाषणात केली.

Aug 15, 2013, 10:22 AM IST

`मोदी-राहुल पंतप्रधानपदाच्या लायकीचे नाहीत`

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाजपकडून नरेंद्र मोदींचं तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव आघाडीवर आहे. पण, हे दोघेही या पदासाठी लायक नाहीत असं मत व्यक्त केलंय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...

Jul 29, 2013, 11:50 AM IST

पंतप्रधान बोलत नाही म्हणताय, मग हे पाहा....

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय.

Jul 23, 2013, 12:13 PM IST

'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'

योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.

Jul 18, 2013, 11:52 AM IST