पंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 22, 2012, 01:02 PM IST`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`
विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.
Sep 22, 2012, 10:31 AM ISTअखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड
तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.
Sep 21, 2012, 04:59 PM ISTआज दिल्लीत रंगणार महाभारत...
ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.
Sep 21, 2012, 11:23 AM ISTमनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा
गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं हे पाऊल उचललंय.
Sep 21, 2012, 11:08 AM ISTपाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान हे सांगितलयं.
Sep 18, 2012, 01:38 PM ISTइंधन दरवाढीच्या निर्णयावर पंतप्रधान ठाम
डिझेल दरवाढीचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी समर्थन केलयं. डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं, असं पंतप्रधानांनी म्हटलंय.
Sep 15, 2012, 07:17 PM ISTपंतप्रधान काय करत आहेत? - मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.
Sep 15, 2012, 01:56 PM ISTमोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.
Sep 3, 2012, 11:12 AM ISTआज पंतप्रधानांच्या निवेदनाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे.
Aug 27, 2012, 11:54 AM IST'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'
'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.
Jun 30, 2012, 11:59 AM IST'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 14, 2012, 02:36 PM ISTमी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन
पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अटकळ खुद्द पंतप्रधानांनीच फेटाळून लावली आहे. जिथं आहे तिथं मी खूष आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
May 30, 2012, 03:40 PM ISTकेंद्राने केली सरकारची घोर निराशा..
महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.
May 8, 2012, 04:06 PM ISTराष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.
May 7, 2012, 10:00 PM IST