सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान
आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.
Jan 30, 2014, 08:03 PM ISTपंतप्रधानांसमोर तोंड दाबून `त्याला` बाहेर काढलं...
नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने गोंधळ घातला. म्हणून `त्याचं` तोंड दाबून त्याला बाहेर काढण्यात आलं.
Jan 29, 2014, 11:32 AM ISTसलमानने गुजरातमध्ये जाऊन मोदींचीच 'पतंग कापली'
नरेंद्र मोदी यांच्या नशिबात जे असेल ते त्यांना मिळो, असं सलमान खानने म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी सलमानची इच्छा आहे का?, या प्रश्नाला सलमान खानने अशी व्यवस्थित बगल दिली.
Jan 14, 2014, 04:03 PM ISTशिंदेंच्या वक्तव्याची शरद पवारांनी काढली हवा!
पंतप्रधानपदासाठीचा दावेदार असल्याची शक्यता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फेटाळून लावलीय. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही त्यामुळं याबाबत प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Jan 13, 2014, 10:45 AM IST`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी
नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.
Jan 9, 2014, 01:51 PM ISTपंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM ISTपवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.
Nov 23, 2013, 11:40 PM IST... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.
Nov 16, 2013, 10:08 PM ISTदेशाच्या फाळणीला काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी
भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.
Nov 10, 2013, 10:06 PM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTलता-आशा माणसं पाहून वागतात- जितेंद्र आव्हाड
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीर इच्छा लतादीदींनी व्यक्त केलीये. काँग्रेसमधून त्यावर प्रतिक्रिया उमटलीये. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
Nov 3, 2013, 08:50 AM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
Nov 2, 2013, 06:55 PM ISTमोदींनी पंतप्रधान व्हावं, हीच दीदींची इच्छा!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलाय. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.
Nov 1, 2013, 10:22 PM ISTउदयनराजेंचं स्वप्न : शरद पवार पंतप्रधानपदी!
‘शरद पवार यांना येत्या काळात पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न आहे’ असं मत खासदार उदयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 26, 2013, 09:00 PM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM IST