punjab

LIVE UPDATE | गुरूदासपूर चकमक संपली, गृहमंत्रालयाची बैठक सुरू

पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये संशयित दहशतवादी हल्ला झाला आहे, चार संशयित दहशतवाद्यांनी गुरूदासपूरहून जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या बसवर गोळीबार केला आहे. 

Jul 27, 2015, 08:38 AM IST

पंजाबमध्ये सेक्स रॅकेट उद्धवस्त, ८ अटकेत

 मोगा येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यावेळी चार महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Jun 6, 2015, 06:17 PM IST

छेडछाडीनंतर बसमधून दोन बहिणींना गाडीतून बाहेर फेकून दिलं

पंजाबच्या मुक्तसरमध्ये पुन्हा एकदा चालत्या बसमध्ये मुलींची छेडछाड आणि मारहाणीचं प्रकरण पुढे आलंय. ही बस एका अकाली दल नेत्याची आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर या मुलींना गाडीतून बाहेर फेकून दिलं गेलं. 

May 15, 2015, 01:22 PM IST

'छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा' - पंजाबचे शिक्षणमंत्री

पंजाबमधील विनयभंग आणि हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. घटनेतील मुलीचा मृत्यू ही इश्वराची इच्छा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे शिक्षण मंत्री सूरजीत सिंग राखा यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर पीडित कुटुबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

May 2, 2015, 02:23 PM IST

चालत्या बसमध्ये अतिप्रसंग, आई-मुलीची बसमधून उडी

 धक्कादायक बातमी. पंजाबमध्ये चालत्या खासगी बसमध्ये अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न झाला. ही बस मुख्यमंत्री बादल यांच्या ट्रव्हल्सची आहे. अतिप्रसंगामुळे मुलगी आणि आईने बसमधून उड्या मारल्या. यात मुलीचा मृत्यू झाला.

Apr 30, 2015, 01:37 PM IST

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

Apr 3, 2015, 04:22 PM IST

युवराजची नाबाद फटकेबाजी, पंजाब विजयी

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीची टी-20 क्रिकेट टूर्नामेंट  दिल्लीत फिरोजशाह कोटला स्टेडिअममध्ये सुरू आहे. यात पंजाबकडून खेळतांना युवराज सिंहने जोरदार फटकेबाजी केलीय, यामुळे पंजाबला हरियाणाचा सात विकेटने पराभव करण्यात यश आलंय.

Mar 25, 2015, 09:54 AM IST

मराठी साहित्य संमेलन : पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम!

पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 'मराठी साहित्य संमेलन २०१५'चा खर्च उचलण्याची तयारी पंजाब सरकारनं दाखवलीय. तसंच हे संमेलन पंजाबचा  सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पार पडणार आहे. 

Mar 7, 2015, 03:56 PM IST

गंडे-दोरे बांधणाऱ्या भोंदूृबाबानं महिलेला पळवलं

गंडे-दोरे बांधणाऱ्या भोंदूृबाबानं महिलेला पळवलं

Dec 25, 2014, 12:55 PM IST

वाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

Nov 3, 2014, 06:59 AM IST

'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम

८८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमानला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. त्यामुळे प्रकाशक नाराज आहेत.

Jul 3, 2014, 09:40 PM IST