९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम
बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.
Dec 11, 2013, 01:59 PM ISTव्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी
रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.
Dec 2, 2013, 01:53 PM ISTसोनिया गांधींच्या सभेवेळी विदर्भवादी नेत्यांची घोषणाबाजी
काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.
Nov 21, 2013, 10:21 PM ISTसोनियांच्या सभेला एसटी महामंडळच दावणीला, अनेकांचे हाल
नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
Nov 21, 2013, 06:01 PM ISTएसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.
Nov 7, 2013, 07:52 PM IST`HIV झाला म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही`
एखाद्याला एचआयव्ही आहे म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकता येणार आहे. असा निर्णय दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं अर्थात एसटीने आपल्या एका चालक कर्मचाऱ्याला कामावरून काढलं होतं.
Sep 5, 2013, 05:57 PM ISTएसटीचा चेहरा आता फेसबूकवर
एसटीने आपला स्मार्ट लूक दाखवण्यास सुरूवात केली आहे. एसटीने आपल्या ताफ्यात होल्वो, शिवनेरी गाड्याची भर टाकली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या सुरू केल्या आहेत. मुंबई ते गोवा एसटी गाडी सुरू केली आहे आणि आता त्याही पुढे पाऊल टाकत एसटीने आता फेसबुकची कास धरत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. एसटी फेसबूकच्या माध्यमातून तुमच्या भेटीला.
Sep 4, 2013, 05:12 PM ISTकोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे, एसटी
गणेशोत्सवात कोकणमध्ये जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे सोडल्या आहेत. तसेच मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ १८०० जादा बसेस सोडणार आहे.
Aug 29, 2013, 12:11 PM ISTगणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल
कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.
Jul 31, 2013, 01:55 PM ISTएसटी प्रवास महागला!
आषाढी वारी तोंडावर असतानाच एसटी प्रवास महागलाय. डिझेल दरवाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती, तसंच महागाई भत्त्यात झालेली वाढ या कारणांमुळे एसटीने भाडेवाढ जाहीर केलीय.
Jun 29, 2013, 08:31 PM ISTएसटीचा २३ एप्रिलपासून बेमुदत संप
एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.
Mar 17, 2013, 08:49 AM ISTएसटी धावणार महिलांच्या सुरक्षेसाठी...
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे.
Feb 5, 2013, 02:31 PM ISTदलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी- आशिष नंदी
जयपूर साहित्य संमेलनात समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी दलित आणि ओबींसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय.
Jan 26, 2013, 07:38 PM ISTमनसेचा मोर्चा, एसटी प्रवाशांचे मात्र झाले हाल
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून मुंबईतल्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला आहे.
Jan 11, 2013, 01:39 PM ISTमनसे म्हणते, मोर्चा काढणारच....
मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.
Jan 11, 2013, 09:33 AM IST