ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - काटोल
काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ... संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीय दृष्ट्याविचार केल्यास काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.
Oct 8, 2014, 05:47 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर उत्तर
राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ... काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट.
Oct 8, 2014, 05:43 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर दक्षिण-पश्चिम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरातला दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ... देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केलाय. तर विरोधकांचा त्यांच्या या दाव्यांवर आक्षेप आहे.
Oct 8, 2014, 05:40 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रत्नागिरी
राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं हे ऑडिट... मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदार संघावर छाप तर पाडलीये. मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते.
Oct 8, 2014, 05:32 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - राजापूर
राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.
Oct 8, 2014, 05:28 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गुहागर
विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत.
Oct 8, 2014, 05:24 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - इस्लामपूर
सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत.
Oct 8, 2014, 05:18 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पलूस-कडेगाव
धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव मतदारसंघाची ओळख. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले असले, तरी त्यांनाही तीन वेळा पराभूत व्हावं लागंलय. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतल्याने लढत रंगतदार आहे हे निश्चित.
Oct 8, 2014, 05:13 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई
वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं.
Oct 8, 2014, 05:03 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पालघर
महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.
Oct 8, 2014, 05:00 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोईसर
बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून केला जातोय तर आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
Oct 8, 2014, 04:55 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - श्रीवर्धन
लोकसभेच्या आखाड्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीये. मात्र तटकरे यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ. श्रीवर्धन... अथांग समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक आवडीने जेथे येतात.
Oct 8, 2014, 04:51 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - अलिबाग
शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा गेली पंचवीस वर्ष इथे फडकत आहे. दोन-तीन अपवाद वगळले तर या मतदार संघातून शेकापचा उमेदवार सातत्याने विजयी होत आहे. त्यामुळे विरोधक कोण असणार यापेक्षा शेकापचा उमेदवार यावेळी कोण असणार याचीच चर्चा अधिक आहे.
Oct 8, 2014, 04:44 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कर्जत
कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी राष्ट्रवादीला चांगलीच फायदेशीर ठरली होती. त्यामुळेच अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदारपदी विराजमान झाले होते.
Oct 8, 2014, 04:40 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - लातूर शहर
लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी लातूर शहर हा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख विद्यमान आमदार आहेत.
Oct 8, 2014, 04:28 PM IST