प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

'मी सध्या आयसीयूमध्ये..ही अस्तित्वाची लढाई..' प्रकाश आंबेडकरांचे रुग्णालयातून भावनिक आवाहन

'मी सध्या आयसीयूमध्ये..ही अस्तित्वाची लढाई..' प्रकाश आंबेडकरांचे रुग्णालयातून भावनिक आवाहन

Prakash Ambedkar Emotional Appeal: प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. 

Nov 02, 2024, 13:50 PM IST
राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...

राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

Sep 29, 2024, 07:03 AM IST
Prakash Ambedkar Prakash Ambedkar's Big Political Secret Blast in To the Point Interview

प्रकाश आंबेडकर यांचा मोठा राजकीय गौप्यस्फोट

Prakash Ambedkar Prakash Ambedkar's Big Political Secret Blast in To the Point Interview

Sep 29, 2024, 00:25 AM IST
...म्हणून मी मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट

...म्हणून मी मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Political News :  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 29, 2024, 00:11 AM IST
आमच्या सोबत आले तर...  प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

आमच्या सोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

Maharashtra Political News :  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आघाडीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

Sep 28, 2024, 23:55 PM IST