प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवान घडामोडीही घडताना दिसतायत

Apr 01, 2024, 18:43 PM IST
वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर, रिंगणात उतरवले 11 उमेदवार

वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर, रिंगणात उतरवले 11 उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

Mar 31, 2024, 21:12 PM IST
मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि...  प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान

मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि... प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान

वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत फारकत

Mar 29, 2024, 16:10 PM IST
वसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'

वसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'

Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली

Mar 29, 2024, 12:49 PM IST
'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना आणखी किती खोटं बोलणार? असा

Mar 28, 2024, 15:07 PM IST
 महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 

Mar 27, 2024, 21:28 PM IST
'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीबरोबर मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरु होती. मात्र आज त्यांनी

Mar 27, 2024, 12:34 PM IST
'मविआ'ला मोठा धक्का! वंचितची जरांगेंबरोबर युती; आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर

'मविआ'ला मोठा धक्का! वंचितची जरांगेंबरोबर युती; आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Manjo Jarange Patil: अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटलांबरोबर चर्चेनंतर स्वतंत्र

Mar 27, 2024, 11:47 AM IST
Loksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव

Loksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव

Maharastra Politics : प्रकाश आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मग मविआमध्ये धावाधाव सुरु झाली. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय.

Mar 26, 2024, 20:45 PM IST