सातारा : साताऱ्यातील जनतेने पुन्हा उदयनराजेंच्या बाजुनेच आपला कौल दिला आहे. त्यामुळे उदयनराजेंची कॉलर पुन्हा टाईट झाली आहे. शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. आजच्या दिवसातील पहिला कल हा नरेंद्र पाटील यांच्या बाजूने लागला होता. पण त्यानंतर उदयनराजेंनी सरशी घेतली ती विजश्री खेचून आणेपर्यंत. सेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी निवडणूकीच्या काही दिवस आधीच उद्धव ठाकरे यांची भेट घेत भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.
उदयनराजे भोसले यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. उदयनराजे यांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून सहदेव देवळे मैदानात होते.
12.00- उदयनराजे भोसले 38 हजार 645 मतांनी आघाडीवर
9.00- पहिल्या फेरीत उदयनराजे पिछाडीवर
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
उदयनराजे भोसले | राष्ट्रवादी | 522531 |
पुरुषोत्तम जाधव | अपक्ष | 155937 |
राजेंद्र चोरगे | आप | 82489 |
अशोक गायकवाड | आरपीआय | 71808 |
संदीप मोझर | अपक्ष | 18215 |