चांडाळ चौकडी कोण? अण्णा तुम्हीच ठरवा

अनंत गाडगीळ अण्णांनी काँग्रेसमधील अनेक लोकांना चांडाळ चौकडी संबोधले आहे, एकप्रकारे त्यांनी टीकाच केली आहे, ज्यापद्धतीने 'टीम अण्णा' काँग्रेसवर टीका करत आहेत, त्याने या लोकांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेस टार्गेटमुळे अण्णा आणि टीम अण्णांचे भष्ट्राचार विरोधी आंदोलन भरकटत चालल्याचे यावरून दिसते.

Oct 26, 2011, 07:09 AM IST

बोरीवली तर बंद करून दाखवा

राम कदम काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.

Oct 25, 2011, 12:27 PM IST

राजकारण नको, मूल्यमापन करा...

सचिन सावंत शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.

Oct 25, 2011, 11:07 AM IST

गडाफीच्या मृत्यूनंतर काय होणार ?

दिवाकर देशपांडे गडाफींच्या मृत्यूने आणखी एका हुकूमशाहीचा अंत झाला. ट्युनेशियातला उठाव, इजिप्तमधला होस्नी मुबारकचा पाडाव अशी मोठ्या प्रमाणावर क्रांती घडत आहे. यातून एक क्रांतीची लाटच जगभर उसळली आहे का असं वाटायला लागचं.

Oct 25, 2011, 10:01 AM IST

उत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'

अरविंद सावंत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.

Oct 25, 2011, 07:42 AM IST

आम्ही राजकारण करत नाही म्हणून...

विवेक पत्की युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?

Oct 22, 2011, 03:55 PM IST

रिक्षाचालक होऊ नका मालक...

अतुल सरपोतदार मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना, अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच.

Oct 22, 2011, 03:53 PM IST

दसरा मेळावा की फसवा मेळावा ?

जनार्दन चांदूरकर शिवसेनचा दसरा मेळावा पार पडला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनेक विषयांना तोंड फोडलं हे मात्र नक्की. वयाच्या 85व्या वर्षीही बाळासाहेबांचा भाषणाचा नूर काही पालटलेला नाही.

Oct 22, 2011, 03:19 PM IST

महापालिकेवर निळा-भगवा फडकविणार

अर्जुन डांगळे दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने रामदासजी आठवलेंना बोलावले नाही, अशी बोंब मारणाऱ्यांना याची माहिती नसावी, असेच वाटते. काही अपवादात्मक परिस्थिती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला भाजपचे काही नेते आले असतील.

Oct 22, 2011, 03:17 PM IST

अण्णांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी

बाबा आढाव अण्णांच्या संदर्भात रोज नव्या नव्या स्वरुपात मांडणी होत आहे. अण्णांचे नेमकेपण काय आहे त्याचा शोध घेण्यात येतो. सध्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहता तर त्यात गैर काहीच नाही.

Oct 22, 2011, 03:15 PM IST

भारनियमनाचा झटका उद्योगजगताला फटका

श्रीराम दांडेकर महाराष्ट्रातील उद्योग आणि उद्योजक वीजेच्या टंचाईमुळे लुळापांगळ्या अवस्थेला आला आहे. वीजेच्या भारनियमनाचा शॉक सहन करण्याच्या पलीकडे गेली आहे.

Oct 22, 2011, 03:11 PM IST

भांडवली गुंतवणूक थांबल्याने 'विजेची गोची'

अशोक पेंडसे भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे. भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे.

Oct 22, 2011, 03:08 PM IST

'दाटे' अंधाराचे जाळे

दिवाकर रावते महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.

Oct 22, 2011, 03:06 PM IST

वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर

अनंत गाडगीळ महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

Oct 22, 2011, 03:04 PM IST

हे बोलणं बरं नव्हं....

मधु चव्हाण ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत.

Oct 22, 2011, 03:03 PM IST

पाहून मुंबईचा विकास, विरोधकांना होतोय त्रास

राहुल शेवाळे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

Oct 22, 2011, 02:55 PM IST

किरण बेदींचे वर्तन अयोग्यच

दिवाकर रावते किरण बेदी या अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधातील लढाईतील फौजेपैकी एक आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनकर्त्याने पावित्र्य जपावं ही लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. किरण बेदींना मुलीचा दाखला मिळण्यासाठी तडजोड केल्याचं सांगितले, कदाचीत ते एका आईने आपल्या मुलीच्या प्रेमापोटी केलं असावं. पण तरीही हे गंभीर आहे.

Oct 22, 2011, 02:54 PM IST

अमेरिकन भांडवलशाहीच्या विरोधतला उद्रेक

सुधीर सावंत लिबियाच्या मुआमर गडाफी जरी अमेरिकेच्या सहाय्याने सत्ताधीश झाला नसला तरी अमेरिकेनेच अनेक देशातल्या हुकूमशहांचा जन्मदाता आहे. अमेरिकेनेच आपल्या स्वार्थासाठी ट्युनेशिया आणि इजिप्तमध्यल्या हुकूमशहांना कायम पाठबळ पुरवलं

Oct 22, 2011, 02:42 PM IST

हेच का भूषणांचे 'भूषण'

अरविंद सावंत अण्णांनी केलेले आंदोलन म्हणजे, एका क्रांतीचा उदय म्हटंल जातं, पण खरचं विचार करता असं जाणवतं की, ही क्रांती होती का म्हणून, कारण की क्रांतीची व्याख्या फार निराळी असते, अण्णांनी सुरू केलेले आंदोलन नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात जी काही लाट उसळली आहे.

Oct 21, 2011, 02:34 PM IST