गडचिरोलीत तब्बल 17 हजार लोकांचा नोटाला कौल
मतदानाच्या दिवशी गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं, मात्र यात नोटा हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. गडचिरोलीत 17 हजार 510 मतदारांनी नोटा या पर्यायावर आपला कौल दिला.
उद्धव ठाकरे 'सध्या वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत!
विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार? असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..
भाजपने आयात केलेले विजयी उमेदवार
भाजपने निवडणुकीच्या तोंडावर अनेक उमेदवार आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांपैकी २२ जणांना भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने जवळपास ५९ उमेदवार आयात केले मात्र त्यातील निम्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतदारांनी घरी बसविले.
भाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.
मोदी लाट एकहाती सत्ता आणण्यास अपयशी
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट दिसून आली. केंद्रात मोदींनी एकहाती सत्ता आणण्यात यश मिळवले. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेजवळ जाता आले तरी एकहाती सत्ता आणण्यास अपयश आले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय सत्तेचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.
देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह
दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय.
...राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेला हा उमेदवार!
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरलेत.
जनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
विजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.
विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?
विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा – प्रफुल्ल पटेल
राज्यात स्थीर सरकार असावी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारशी बोलताना ही माहिती दिली.
भाजपकडून प्रस्ताव आल्यास विचार करून – देसाई
भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करून असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी झी २४ तास बोलताना सांगितले
UPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल
विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...
UPDATE - मुंबई - ठाणे - कोकण निकाल
12.04 PM वडाळामधून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी 12.03 PM राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहीर यांना शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केले पराभूत 12.01 PM राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी 11.51 AM शिवडीमधून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी, मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकर पराभूत 11.50 AM चिपळूण शिवसेनेचे सदानद चव्हाण विजयी 11.32AM बोरीवलीमधून भाजपचे विनोद तावडे विजयी 11.30AM
UPDATE - विदर्भ विभाग निकाल
दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल
उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.
दिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या
पुण्यात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. राजु दर्शिले यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा
भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय.