मुंबई : मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आपण राजकीय भाषण करणार नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंड सुख घेतले.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचं भाषण:
- आज आपल्या मातृभाषेचा उत्सव आहे.
- आज राजकीय काही बोलणार नाही. कारण अर्थाचा अनर्थ निघू शकतो
- बऱ्याच दिवसांनी मराठी भाषणाचं वेगळं रूप पाहायला मिळालं
- गेले दोन महिने सुरु होती ती फक्त कचकच...
- माझ्यावर टीका होते की आम्ही मराठी - मराठी करतो पण यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात
- पण आमची मुलं इंग्रजी जितकं उत्तम बोलतात तितकंच उत्तम मराठी देखील बोलतात
- दर वर्षी या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे, मराठी भवन उभारलं पाहिजे असं बोललं जातं पण करत कोणीच काही नाही
- तुम्हाला अधिकार दिलेला आहे. जमत नसेल तर शिवसेना एकटी करायला समर्थ आहे
-मला पुन्हा एकदा लोकाधिकार हवी आहे. झोकून काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत.
- आयाराम - गयाराम सुरु असतं... तसं होता कामा नये अन्यथा आपला भाजप व्हायला वेळ लाहणार नाही
- पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले कारभार सोडून प्रचारात व्यस्थ
- लष्करभरतीचा पेपर फुटतो. ज्यांच्या हातात देशाची सुरक्षा आहे त्यांचा पेपर सुरक्षित नाही, कुठल्या दिशेने चाललोय आपण
- याचं कारण देशाच्या कारभारावर कोणाचं लक्षच नाही
- युतीत सडलो, आता त्याचं दुःख करून काही मिळणार नाही
- शिवरायांना, कुसुमाग्रजांना आणि बाळासाहेबांना अभिमान वाटेल अशी शिवसेनेची वाटचाल भविष्यात करू
- आज मराठी भाषा दिनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचं हस्तांतरण झालं हा खूप चांगला योगायोग