आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार ?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या शह-काटशहाचा फटका राज्यातील जिल्हा बँकांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना बसू लागला. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Jun 5, 2012, 04:14 PM ISTनाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.
May 5, 2012, 11:07 PM ISTकोल्हापूरमध्येही अफूची शेती
कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 14, 2012, 08:30 AM ISTविहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत
जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.
Mar 8, 2012, 03:15 PM ISTरायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
Feb 29, 2012, 03:21 PM ISTगुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Feb 24, 2012, 11:40 AM ISTहळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न
लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.
Jan 13, 2012, 08:49 PM ISTशेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर
लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.
Jan 6, 2012, 05:47 PM ISTकांदा शेतकऱ्यांना रडवणार?
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावलाय. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय.
Jan 4, 2012, 09:51 PM ISTशेतक-यांनी कर्जमाफी नाकारली
इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी कर्जमाफी नाकारलीये...हा अजब दावा केलाय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच तालुक्यातल्या इंदापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने. कर्जमाफीची रक्कम नेण्यासाठी एकही शेतकरी आला नसल्याचा दावा करत बँकेनं तब्बल सात कोटी ७१ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम सहकार खात्याला परत पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
Dec 24, 2011, 04:18 PM ISTगरीबिपुढे शेतकऱ्यांने टेकले हात
मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला.
Dec 17, 2011, 11:27 AM ISTशेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत
एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.
Dec 14, 2011, 12:26 PM ISTविमानतळाने शेतकऱ्यांची झोप उडवली
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता प्रस्तावित विमानतळासाठीही तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतजमीन संपादित केली जाणार आहे.
Dec 14, 2011, 12:11 PM ISTनागपुरात शेतकऱ्यांची गांधीगिरी
शेतक-यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेनं नागपुरात दोन दिवसीय शेतकरी प्रती विधानसभेचं आयोजन केलयं.
Dec 10, 2011, 03:42 PM ISTशेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'
कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.
Dec 2, 2011, 02:37 PM IST