मध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.
Dec 8, 2013, 09:13 AM ISTछत्तीसगढ: भाजप-काँग्रेसमध्ये घमासान, रमण सिंह यांची हॅट्रटीक?
आता पाहुयात छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये घमासान रंगलंय. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ५० जागांवर विजय मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं. काँग्रेसला केवळ ३८ जागा मिळवता आल्या. तर बसपाच्या खात्यात २ जागा गेल्या.
Dec 8, 2013, 08:58 AM ISTकेंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या
काँग्रेस नेते राहुल गांधींचे मित्र आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या कंपनीला अंधेरी येथील सुमारे १०० कोटी रूपयांचा भूखंड दिल्याबाबतची फाइल मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाली आहे.
Dec 6, 2013, 08:27 PM ISTएक्झिट पोलवर काँग्रेसला नाही विश्वास
एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.
Dec 6, 2013, 10:32 AM ISTजातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.
Dec 5, 2013, 04:05 PM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM IST‘ह्युफिग्टंन पोस्ट’ची माघार... सोनियांचं नाव हटवलं
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बहुआकडी संपत्तीवरून वाद सुरू झालाय. दरम्यान, हे संपत्तीचे आकडे उघड करणाऱ्या ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वेबसाइटनं या वादातून काढता पाय घेत सोनिया गांधींचं ‘डिलीट’ मारलंय. ‘हफिंग्टन पोस्ट’नं जाहीर केलेल्या श्रीमंत २० नेत्यांच्या यादीत आता मात्र सोनिया गांधींचं नाव दिसत नाही.
Dec 3, 2013, 03:21 PM ISTबँक घोटाळा : काँग्रेस आमदाराला १२९.३१ कोटींचा दंड!
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने कॉंग्रेस आमदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.
Nov 28, 2013, 08:37 PM IST`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे
माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.
Nov 27, 2013, 08:17 AM ISTदोन्ही काँग्रेस बेईमानीची औलाद – गोपीनाथ मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बेईमानीची औलद असून हे मंत्रीमंडळ म्हणजे अलीबाबा चाळीस चोर असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.
Nov 25, 2013, 11:12 AM ISTसिंधुदुर्गात काँग्रेस – शिवसेनेत राडा! पोलिसांवरही दगडफेक
सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या आमने-सामने या कार्यक्रमात राडा झालाय.
Nov 24, 2013, 09:36 PM ISTनारायण राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका
काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करू, असे जाहीर आव्हान राणे यांनी दिले.
Nov 22, 2013, 05:28 PM ISTसोनिया गांधींच्या सभेवेळी विदर्भवादी नेत्यांची घोषणाबाजी
काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.
Nov 21, 2013, 10:21 PM ISTसोनियांच्या सभेला एसटी महामंडळच दावणीला, अनेकांचे हाल
नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
Nov 21, 2013, 06:01 PM ISTइश्कजादे मोदी आणि महिलेचे वडील काकुळतीला...
गुजरातच्या एका महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याच्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. ज्या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय त्या महिलेच्या वडिलांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे काहीही गरज नसल्याचं म्हटलंय.
Nov 20, 2013, 04:53 PM IST