congress

राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्यव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. तसेच समाजवादी पक्षानेही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केलीय.

Oct 26, 2013, 07:41 AM IST

सचिन स्वत:च घेईल निर्णय... - मुख्यमंत्री

निवृत्त झाल्यानंतर राजकारणात शिरून काय काम करायचं? याचा निर्णय सचिनच घेईल, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिनतर्फे बॅटींग केलीय.

Oct 22, 2013, 10:28 PM IST

`काँग्रेसनं मोदींच्या नावानं मुस्लिमांना घाबरवू नये`

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधातील वातावरण आपल्या बाजुला वळवण्यासाठी सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रयत्नांवर ‘जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद’ या संघटनेचे प्रमुख सय्यद महमूद मदनी यांनी जोरदार टीका केलीय.

Oct 15, 2013, 03:40 PM IST

जागावाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादीपुढे नरम!

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. या संदर्भातसोमवारी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली.

Oct 15, 2013, 07:17 AM IST

मोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेस प्रियांका अस्त्राची वापर करणार असल्याची माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली होती. काँग्रेसनं मात्र या वृत्ताचं तत्काळ खंडन केलंय.

Oct 14, 2013, 03:21 PM IST

राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसवर नाराज

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाचा तिढा सुटण्याची शरद पवारांना आशा आहे. दोन्ही पक्षांमधला हा वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा पवारांनी व्यक्त केलीय. तसंच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Oct 12, 2013, 03:13 PM IST

२०१६ मध्ये सोनिया गांधी होणार रिटायर्ड?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या २०१६ मध्ये ७० वर्षांच्या झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा, दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. `२४ अकबर रोड` या पुस्तकात किडवई यांनी हा दावा केला आहे.

Oct 9, 2013, 06:28 PM IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, मेटे-फडणवीस यांची भेट

भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवरून मराठा आरक्षणावरून राजकीय वादळ उठण्यास सुरूवात झाली आहे.

Oct 8, 2013, 02:35 PM IST

राहुल गांधी X नरेंद्र मोदी सामना, विरोधकांना धूळ चारू - राहुल

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विरोधकांना २०१४ मध्येही धूळ चारू असा निर्धार काँग्रेसचे उपाध्य़क्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी - नरेंद्र मोदी सामना होण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत.

Oct 8, 2013, 02:10 PM IST

ठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.

Oct 8, 2013, 07:24 AM IST

आईने सांगितले, माझी भावना बरोबर होती - राहुल गांधी

दोषी खासदारांच्या वटहुकुमाबाबत वापरलेला `बकवास` हा शब्द चुकीचा होता. आपण शब्द जरी कडक वापरले असले तरी आपली भावना बरोबर होतं असं मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

Oct 4, 2013, 02:18 PM IST

राहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकूम मागे...

कलंकीत लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणारा वटहुकूम अखेर केंद्र सरकारनं मागे घेतलाय. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

Oct 2, 2013, 06:57 PM IST

मुख्यमंत्र्यांचं विदर्भाकडे दुर्लक्ष, मुत्तेमवारांचा घरचा आहेर!

मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि विदर्भाकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.

Oct 2, 2013, 03:47 PM IST

`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

Oct 2, 2013, 11:48 AM IST

सोनिया, राहुलप्रमाणे आमचा पक्ष चालवू - राबड़ीदेवी

ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.

Oct 1, 2013, 05:48 PM IST