encounter

गुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

Mar 1, 2016, 01:33 PM IST

छत्तीसगडमध्ये पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार झालेत. 

Mar 1, 2016, 11:56 AM IST

अंधेरीत पोलिसांशी चकमकीत, कुख्यात गुंड ठार

एका हॉटेलमध्ये अंधेरी येथील विमानतळ परिसरातील रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला.  गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 

Feb 7, 2016, 10:20 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.

Oct 5, 2015, 12:41 PM IST

मुंबईत पाहिलं नाही असं एन्काऊंटर पाहा LIVE

ब्राझील : ब्राझिलमधील लाईव्ह एनकाऊन्टरचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या एन्काऊंटरमध्ये तरूणीला वाचवणाऱ्या एका अनाथाचा मृत्यू झाला आहे.

Sep 9, 2015, 10:45 PM IST

'गँगस्टर'च्या एन्काऊंटरऐवजी नेत्याचीच हत्या...

शिरोमणी अकाली दलाचा एक कार्यकर्ता आणि पंजाब पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, गँगस्टर समजून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता. 

Jun 17, 2015, 06:56 PM IST

झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार

 झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार झाले आहेत. पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. यात  १२ माओवादी ठार झाले आहेत. तर, गोळीबारात एकही सुरक्षा रक्षक जखमी झालेला नाही. तसेच माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

Jun 9, 2015, 11:19 AM IST

'नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा झाला लैंगिक अत्याचार'

आमिर खानचा सिनेमा 'डेल्ही बेली' तसंच 'ये जवानी है दीवानी' फेम पूर्णा जगन्नाथन हीनं आपल्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Apr 7, 2015, 05:18 PM IST