lok sabha

लोकसभेत सोनिया-राहुल गांधींची ‘दांडी’ अधिक

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची वेगळीच `दांडी`यात्रा सध्या सुरू आहे.लोकसभेच्या निम्म्याहून अधिक बैठकांना दांडी मारणा-या ९२ खासदारांमध्ये राहुल गांधीसोबतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.

Aug 6, 2013, 09:23 AM IST

पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल

लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

Apr 27, 2013, 03:44 PM IST

बलात्कारविरोधी बिल : लोकसभेतून राज्यसभेत!

बलात्कारविरोधी बिल लोकसभेत मंजूर झालंय. हे बिल आज राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे बिल लोकसभेत मांडलं.

Mar 20, 2013, 11:09 AM IST

सोनिया गांधी यांनी धरले खासदाराचे मानगुट!

लोकसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्की अधिकच गोंधळात भर पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चक्क समाजवादी पार्टीच्या खासदार यशवीर सिंग यांचे मानगुट पकडले.

Dec 20, 2012, 03:56 PM IST

माया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!

रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.

Dec 5, 2012, 07:13 PM IST

लालूंच्या अर्धवट इंग्रजीची संसदेत खिल्ली

राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या इंग्रजी बोलण्यावरून लोकसभेत जोरदार खसखस पिकली. ‘एअर होस्टेस’ ला एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केल्याने त्यांच्या इंग्रजी बोलण्याची खिल्ली उडविली गेली.

Dec 5, 2012, 04:09 PM IST

संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प

एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेचे सलग चार दिवस कोणतेही कामकाज होवू शकलेले नाही.

Nov 27, 2012, 01:04 PM IST

आता लढा संसदेबाहेर, भाजप भूमिकेवर ठाम

‘कोळसा खाण घोटाळा’ देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात युपीए सरकारचेच मंत्री अडकल्याचा आरोप भाजपनं आज एका पत्रकार परिषदेत केलाय.

Sep 7, 2012, 03:57 PM IST

व्यंग्यचित्रे पाठ्यपुस्तकांतून होणार हद्दपार

व्यंग्यचित्रांबाबत संसदेत सर्वच खासदारांनी आवाज उठविल्याने आता जी काही शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात व्यंग्यचित्र असतील ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

May 15, 2012, 09:20 AM IST

सरकार सुपर लोकपाल आणू शकत नाही - सिब्बल

लोकपालमध्ये आरक्षण हे घटनेचे उल्लंघन नाही, गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून लोकायुक्त नाही, त्या ठिकाणी भाजपने काय केले आहे, असा सवाल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकपाल संदर्भात संसदेत सुरू झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

Dec 27, 2011, 04:34 PM IST

कोंडी फुटली, संसदेचं कामकाज सुरू

एफडीआयच्या मुद्यावर आज अखेर कोंडी फुटली. त्यामुळं नऊ दिवसांपासून ठप्प असलेलं संसदेचं कामकाज आजपासून सुरू झालं.

Dec 7, 2011, 07:46 AM IST

लोकसभेतील गोंधळाने कोट्यवधींचा चुराडा

संसदेत होणा-या गदारोळामुळं जनतेच्या पैशाचा मोठा चुराडा होत आहे. याचे विरोधकांसह खासदारांना देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Dec 1, 2011, 06:22 AM IST