रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.
Mar 13, 2014, 05:45 PM ISTसुरेश खोपडे हे`आप`चा हिट फॉर्म्युला, बारामती करणार सर?
लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
Mar 12, 2014, 10:08 PM IST‘आप’ची मुंबईत तोडफोड, चौकशी करणार – आर आर
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Mar 12, 2014, 05:37 PM ISTलोकसभा निवडणूक : `आप`ची पाचवी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.
Mar 12, 2014, 04:30 PM ISTमावळमधून सेनेतर्फे श्रीरंग बारणे, बाबरांचा पत्ता कापला
मावळमधून शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांना लाकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Mar 11, 2014, 07:36 PM ISTमनसे लोकसभा निवडणूक लढवणार ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्चला जाहीर होणार आहे.
Mar 7, 2014, 08:09 PM ISTनिवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार
लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाची उद्या सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद आहे.
Mar 4, 2014, 07:47 PM ISTहे आहेत राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज आणि उद्या मुंबईत पुन्हा बैठक होत आहे. लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 22, 2014, 03:51 PM IST...आणि लोकसभेत खासदार झालेत भावूक
युपीए दोन सरकरचं अखेरचं अधिवेशन तर पंधराव्या लोकसभेचा आज अखेरचा दिवस. सर्वच पक्षांचे नेते आणि खासदार लोकसभेत गेल्या पाच वर्षांच्या आठवणी जागवत भावूक झाले होते.
Feb 21, 2014, 07:55 PM ISTतेलंगणा विधेयक मंजूर, हैदराबादमध्ये जल्लोष
संसदेतल्या नाट्यमय घडामोडींनंतर वादग्रस्त तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमांध्रांला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली.
Feb 18, 2014, 04:39 PM ISTराष्ट्रवादीचा विजयी होणाऱ्या जागांवर डोळा?
लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पद्धतशीरपणे योजना आखलीय. त्यासाठी सुरक्षित आणि विजयाची खात्री असणारेच मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतले जातायत. कोकणातल्या रायगड मतदार संघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतायत.
Feb 7, 2014, 08:32 PM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
Feb 5, 2014, 09:49 AM ISTराष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू
राष्ट्रावादीनं जागावाटपासंदर्भात निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसची धावाधाव सुरू झालीय. याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची पहिली बैठक दिल्लीत झाली.
Feb 2, 2014, 11:50 PM IST<b><font color=red>काय बोलले राहुल गांधी</font></b>
राहुल गांधी यांचे एआयसीसीतील भाषण लाइव्ह....
Jan 17, 2014, 04:18 PM ISTजनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM IST