नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Delhi blast news Nitin Gadkari Condemned Delhi Car Blast Near Red Fort Area

दिल्ली स्फोटातील दोषींना... नितीन गडकरी यांचा थेट इशारा...

Delhi blast news Nitin Gadkari Condemned Delhi Car Blast Near Red Fort Area

Nov 11, 2025, 14:40 PM IST
रोजगार मेळाव्यात महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरुन वाद अन् नितीन गडकरींचा 'तो' एक कटाक्ष...

रोजगार मेळाव्यात महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरुन वाद अन् नितीन गडकरींचा 'तो' एक कटाक्ष...

नागपुरातील रोजगार मेळाव्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला अधिकारी स्टेजवरच एकमेकांशी खुर्चीवरुन वाद करताना दिसत आहे. 

Oct 25, 2025, 11:53 AM IST
राजकीय बैठका, भेटीगाठींतून वेळ काढत गडकरींनी पुरवला नातवंडांचा हट्ट; मंत्री नव्हे, आजोबांचं हे रुप मन जिंकणारं....

राजकीय बैठका, भेटीगाठींतून वेळ काढत गडकरींनी पुरवला नातवंडांचा हट्ट; मंत्री नव्हे, आजोबांचं हे रुप मन जिंकणारं....

Diwali Celebration Nitin Gadkari: बालहट्ट पुरवण्यासाठी नितीन गडकरी पोहोचले बाजारपेठेत... दुकानदारही थक्क....नातवंडांमध्ये रमणारे हे केंद्रीय मंत्री पाहिले? 

Oct 18, 2025, 14:50 PM IST
बिहार निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील 3 नेत्यांचा समावेश, तिसरं नाव वाचून वाटेल आश्चर्य

बिहार निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील 3 नेत्यांचा समावेश, तिसरं नाव वाचून वाटेल आश्चर्य

BJP Star Campaigners List for Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे.   

Oct 16, 2025, 18:36 PM IST
कुत्री, कबुतरांपेक्षा इथं लक्ष घाला; गडकरी, फडणवीसांना टॅग केलेली सुमित राघवनची Insta स्टोरी पहिली का?

कुत्री, कबुतरांपेक्षा इथं लक्ष घाला; गडकरी, फडणवीसांना टॅग केलेली सुमित राघवनची Insta स्टोरी पहिली का?

Sumeet Raghvan To CM fadnavis Nitin Gadkari: सुमितने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Aug 21, 2025, 12:57 PM IST
Union Minister Nitin Gadkari Received House Blast Threat Police Arrest Accused

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, घर उडवण्याची धमकी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, घर उडवण्याची धमकी

Aug 03, 2025, 15:55 PM IST
अमेरिका-चीनला मागे टाकून भारत असा बनणार नंबर 1; नितीन गडकरींचा मास्टरप्लान ऐकून तुम्हाला वाटेल आनंद!

अमेरिका-चीनला मागे टाकून भारत असा बनणार नंबर 1; नितीन गडकरींचा मास्टरप्लान ऐकून तुम्हाला वाटेल आनंद!

Nitin Gadkari:  ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत नंबर 1 होण्याबद्दल  काय म्हणाले नितीन गडकरी? सविस्तर जाणून घेऊया. 

Jul 31, 2025, 15:41 PM IST
राज ठाकरे ते पंतप्रधान मोदी... दिव्या देशमुखवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

राज ठाकरे ते पंतप्रधान मोदी... दिव्या देशमुखवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

१९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं आहे. 

Jul 28, 2025, 22:43 PM IST

गरीब-श्रीमंतांमधील दरीबाबत गडकरींकडून चिंता

गरीब-श्रीमंतांमधील दरीबाबत गडकरींकडून चिंता

Jul 07, 2025, 19:45 PM IST
हायपरलूप, इलेक्ट्रिक बस अन् रोपवे...; नितीन गडकरींनी सांगितला वाहतूकीचा मेगा प्लान, नागपूरसाठीही मोठी घोषणा

हायपरलूप, इलेक्ट्रिक बस अन् रोपवे...; नितीन गडकरींनी सांगितला वाहतूकीचा मेगा प्लान, नागपूरसाठीही मोठी घोषणा

Nitin  Gadkari Mega Mobility Plan: नितीन गडकरी यांनी देशातील वाहतूक व्यवस्थेबद्दल काही महत्त्वाचे प्रकल्प जाहीर केले आहेत. 

Jul 07, 2025, 15:18 PM IST
NCP MLA Jayant Patil On Nitin Gadkari Controversial Remarks

२०२९ के बाद पिक्चर दिखाया तो क्या फायदा, जयंत पाटीलांचं नितीन गडकरींना प्रत्युत्तर

२०२९ के बाद पिक्चर दिखाया तो क्या फायदा, जयंत पाटीलांचं नितीन गडकरींना प्रत्युत्तर

Jun 22, 2025, 20:25 PM IST
Nitin Gadakari: 2029 मध्ये कोणत्या रुपात दिसणार? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं, 'पिक्चर अभी बाकी है'

Nitin Gadakari: 2029 मध्ये कोणत्या रुपात दिसणार? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं, 'पिक्चर अभी बाकी है'

Nitin Gadkari: 2029 च्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेवर गडकरींनी भाष्य केलंय,

Jun 22, 2025, 10:00 AM IST
Fastag वार्षिक पास काढल्यास तुम्हाला किती रुपयांचा फायदा? किंमतीत बायकोला घ्याल 2 नव्याकोऱ्या पैठणी!

Fastag वार्षिक पास काढल्यास तुम्हाला किती रुपयांचा फायदा? किंमतीत बायकोला घ्याल 2 नव्याकोऱ्या पैठणी!

Fastag Annual Pass: 3 हजार  रुपयांचा पास बनवून तुम्ही वर्षभर टोल प्लाझावरून जाऊ शकाल. 

Jun 19, 2025, 18:46 PM IST