indian railway

भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली?

भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली की काय असा प्रश्न निर्माण होणारं उदाहरण समोर आलं आहे. 

Jan 5, 2016, 08:49 AM IST

लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला

रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.

Dec 30, 2015, 06:30 PM IST

आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल भारतात उभारणार

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय रेल्वे आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा पूल उभारणार आहे. चिनाब नदीवर भारतीय रेल्वे ३५९ मीटर उंचीचा पूल बांधणार आहे. हा पूल आयफेल टॉवरहून ३५ मीटरहून अधिक उंच असणार. 

Dec 18, 2015, 10:27 AM IST

प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.

रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

Nov 18, 2015, 09:37 AM IST

रेल्वेने गुपचूप दिला जोरदार झटका, तुम्हांला माहीत आहे का?

रेल्वेने गुपचूप प्रवाशांवर एक आणखी ओझं टाकलं आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता स्पेशल ट्रेनच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. स्पेशल ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये रेल्वे प्रवाशांकडून तात्काळ प्रवासाचे पैसे वसूल करणे सुरू केले आहे. 

Oct 16, 2015, 02:06 PM IST

रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार

रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.

Oct 8, 2015, 08:43 PM IST

रेल्वेने तिकीट बुकिंग वेळेत पुन्हा केला बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

Sep 19, 2015, 01:17 PM IST

रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी

रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे. 

Aug 21, 2015, 03:51 PM IST

रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच

रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल. 

Jun 25, 2015, 04:47 PM IST

रेल्वेसह, सार्वजनिक वाहतुकीचं वेळापत्रक 'गुगल मॅपवर'

भारतीय रेल्वे तसेच सार्वजनिक वाहतूक सेवांचे वेळापत्रक आता गुगल मॅपवर दिसणार आहे. गुगलने आज ही घोषणा केली.

May 12, 2015, 07:31 PM IST

'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी

रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

Apr 14, 2015, 11:06 AM IST

ऐन सणावारात ग्राहकांना फटका, रेल्वेचं तात्काळ तिकीट महागलं

प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेनं ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.

Oct 2, 2014, 07:37 PM IST

भरती: भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभाग

भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात भरती
भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात शिकाऊ कारागिर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आय.टी.आय पास उमेदवारांची भरती करण्यात येत आहे.
अधिक तपशील मिळवण्यासाठी http://www.swr.indianrailways.gov.in वर संपर्क साधा

 

Aug 13, 2014, 01:32 PM IST

सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री

 रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय. 

Jul 8, 2014, 08:43 PM IST