अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. 

Dec 03, 2024, 19:43 PM IST
अमित शाहांनी खरंच अजित पवारांना भेट नाकारली? नेमकं काय घडलं?

अमित शाहांनी खरंच अजित पवारांना भेट नाकारली? नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Election : सुनील तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टच सांगितलं. अमित शाह आणि अजित पवार यांच्यात...   

Dec 03, 2024, 11:12 AM IST
महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट

महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 

Dec 02, 2024, 20:30 PM IST
'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी

Dec 02, 2024, 14:11 PM IST
सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा

Dec 01, 2024, 16:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde)

Dec 01, 2024, 15:53 PM IST
Ajit Pawar On Mahayuti Maharashtra CM And DCM Formula

महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरला, अजित पवारांची माहिती

महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरला, अजित पवारांची माहिती

Dec 01, 2024, 12:00 PM IST
मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

Nov 30, 2024, 18:46 PM IST
Ajit Pawar Meets Baba Adhav

अजित पवार बाबा आढावांच्या भेटीला, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित

अजित पवार बाबा आढावांच्या भेटीला, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित

Nov 30, 2024, 18:25 PM IST
बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणतात, 'जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार?'

बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणतात, 'जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार?'

Baba Aadhav: उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले आहे.

Nov 30, 2024, 17:51 PM IST
 ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

Ajit Pawar : ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करून दाखवा असे आव्हानअजित पवारांनी विरोधकांना दिले आहे. 

Nov 30, 2024, 15:55 PM IST
मागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

मागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. 

Nov 29, 2024, 20:55 PM IST
'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'

'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'

Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde

Nov 29, 2024, 17:09 PM IST
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Nov 29, 2024, 12:52 PM IST
'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST
मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

Maharashta CM: दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.

Nov 28, 2024, 20:53 PM IST